JOIN US
मराठी बातम्या / Viral / लहान मुलांना कोरोनापासून वाचवण्यासाठी आला 'वॉरिअर रोबोट', पाहा VIDEO

लहान मुलांना कोरोनापासून वाचवण्यासाठी आला 'वॉरिअर रोबोट', पाहा VIDEO

लहान मुलांमध्ये कोरोनाचा धोका वाढला, चिमुकल्यांसाठी काय काय केलं जात आहे पाहा.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीजिंग, 12 मे : कोरोनाव्हारसमुळं सर्व देशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 60 वर्षांवरील वृद्ध आणि लहान मुलांना कोरोनाचा जास्त धोका आढळून आला आहे. त्यामुळं प्रत्येक देशात वयोवृद्ध आणि लहान मुलांची विशेष काळजी घेतली जात आहे. अशातच चीनमध्ये लॉकडाऊन रद्द करून लहान मुलांच्या शाळाही सुरू करण्यात आल्या आहेत. शाळेत कोरोनापासून प्रत्येक विद्यार्थ्यांना वाचवण्याचा विचित्र उपाय केले जात आहे. चीनच्या वुहानपासून जगभरात कोरोनाचा प्रसार होण्यास सुरुवात झाली. मात्र चीनमध्ये परिस्थिती आटोक्यात आल्यामुळं लॉकडाऊन रद्द करण्यात आला आहे. यामुळं बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक ठिकाणे आणि शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. अशाच एक चीनमधील शाळेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाचा- VIDEO : लॉकडाऊनमध्ये पोलिसाची ‘सिंघम’ गिरी, ड्यूटी सोडून करत आहे खतरनाक स्टंट व्हायरल होत असलेल्या या 45 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये कोरोनापासून लहान मुलांना वाचवण्यासाठी त्यांचे हात, पाय, कपडे सर्व सॅनिटाइज केले जात आहे. त्यांच्या दप्तरांवरही सॅनिटायझर मारले जात आहे. एवढंच नाही तर एक रोबोट चक्क मुलांची तपासणी करतो. म्हणजे शाळेत गेल्यानंतर मुलांचा अर्धावेळ हा तपासणीमध्येच जातो. या मुलांची रोजच्या रोज तपासणी केली जाते. या व्हिडीओमध्ये रोबोट मुलांचे तापमान चेक करताना दिसत आहे. ट्विटरवर सध्या मुलांच्या रक्षणासाठी वापरण्यात येत असलेल्या तंत्रज्ञानाचे कौतुक केलं जात आहे. वाचा- कॅन्सरग्रस्त लेकीला कोरोनापासून वाचवण्यासाठी 50 दिवस दूर होता बाप, अखेर झाली भेट

संबंधित बातम्या

वाचा- रस्त्यावर चालता चालता गर्भवती महिलेनं दिला बाळाला जन्म, VIDEO VIRAL मात्र, चीनमध्ये कोरोना आटोक्यात आला आहे. गेल्या एका महिन्यापासून चीनमध्ये कोरोनामुळं एकाची मृत्यू झालेला नाही. तर, 36 दिवसांनी पहिल्यांदा रविवारी वुहानमध्ये एक कोरोना रुग्ण आढळून आला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या