JOIN US
मराठी बातम्या / Viral / बापरे! श्वानाला वाचवण्यासाठी मुलांनी अजगराच्या विळख्यात टाकले आपले चिमुकले हात; काय झाला शेवट पाहा VIDEO

बापरे! श्वानाला वाचवण्यासाठी मुलांनी अजगराच्या विळख्यात टाकले आपले चिमुकले हात; काय झाला शेवट पाहा VIDEO

श्वानाला अजगरापासून वाचवण्यासाठी मुलांनी आपला जीव धोक्यात टाकून शेवटपर्यंत प्रयत्न केला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 06 ऑगस्ट : अजगराच्या विळख्यात कुणी सापडलं की त्याची सुटका जवळपास अशक्यच. भलेभले प्राणीही अजगराच्या तावडीतून स्वतःची सुटका करू शकत नाहीत. अजगराने कुणाला जखडलं तरी त्याला सोडवण्याची हिंमतही अनेकांची होत नाही. पण एका श्वानाला अजगराच्या तावडीतून सोडवण्यासाठी दोन लहान मुलांनी आपल्या जीवाची बाजी लावली. श्वानाभोवतीचा अजगराचा विळखा सोडवण्यासाठी त्यांनी आपले चिमुकले हात या अजगराच्या विळख्यात टाकले. हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका श्वानाला अवाढव्य अजगराने जखडलं. त्याच्याभोवती वेटोळे घातले. अजगराने श्वानाला घट्ट विळखा घातला. आता सामान्यपणे कुणीही हे पाहिलं असतं तर घाबरून आधी आपला जीव वाचवण्यासाठी तिथून पळाला असता. पण दोन मुलांनी मात्र या श्वानाला अजगराच्या विळख्यातून सोडवण्याची धडपड केली. श्वानाचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी आपला जीव धोक्यात टाकला. हे वाचा -  खाणं द्यायला म्हणून गाडीची खिडकी उघडली, भुकेल्या वाघाने झडप घातली अन्…; थरारक VIDEO व्हिडीओत पाहू शकता अजगराने किती घट्ट श्वानाला विळखा घातला. श्वान ओरडतो आहे. पण त्याला हलताही येत नाही आहे. त्यानंतर एक व्यक्ती हातात काठी घेऊन अजगराचा विळखा सोडवण्याचा प्रयत्न करते. तर समोरच दोन मुलं आहेत जी अजगरावर दगड, लाकूड, त्यांच्या हातात जे काही लागत होतं, ते फेकून मारत होते. जेणेकरून अजगराचा विळखा सैल होईल.

संबंधित बातम्या

शेवटी ती व्यक्ती अजगराची शेपटी आणि तोंड वेगळं करण्यात यशस्वी होते. अजगराचा तोंडाकडील भाग आपल्या हातात घेते. मग ती मुलं अजगरावर तुटून पडतात. अजगराची शेपटी धरतात आणि आपल्या चिमुकल्या हातांनी श्वानाभोवतीचा त्याचा विळखा सोडवतात. अजगराचं वजन त्यांच्या छोट्या छोट्या हातांना पेलणारं नाही. पण तरी त्यांच्यात जितकी ताकद आहे तितकी ते सर्व काढतात आणि तो विळखा सोडवून श्वानाची सुटका करतात. हे वाचा -  भलतीच डेअरिंग करत थेट खतरनाक मगरीलाच मारली मिठी आणि…; तरुणाचं काय झालं तुम्हीच पाहा VIDEO @_figensezgin ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. दोन्ही चिमुकल्यांनी त्या व्यक्तीच्या मदतीने श्वानाला अजगराच्या कचाट्यातून बाहेर काढलं. त्याला मृत्यूच्या दारातून खेचून बाहेर काढलं. या मुलांच्या हिमतीचं कौतुक केलं जातं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या