JOIN US
मराठी बातम्या / Viral / Video : टोल नाक्यावर महिलेला वाहन चालकाकडून कानशिलात, या मागचं कारण सांगत म्हणाला...

Video : टोल नाक्यावर महिलेला वाहन चालकाकडून कानशिलात, या मागचं कारण सांगत म्हणाला...

टोल बुथ बाहेर एक पांढरी कार उभी आहे, ज्यामधून एक व्यक्ती रागाने खाली उतरते आणि या महिलेच्या कानशिलात वाजवते.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 24 ऑगस्ट : आपण कोणत्याही एक्सप्रेस वे वरुन प्रवास केला, तर आपल्याला टोल नाका लागतो, जेथे आपल्याला टोल भरावा लागतो. या टोलवरती बाईकना सुट दिली जाते, परंतु कार, बस, ट्रक सगळ्यांच गाड्यांना हा टोल बंधनकारक आहे, गेल्या काही वर्षांपासून क्रेंद्र सरकारने टोल भरण्यासाठी fastag ही प्रणाली आणली होती, ज्याद्वारे वाहन चालकाच्या बँकेतून पैसे कापले जातील, ज्यामुळे टोल नाक्यावरील गर्दी कमी होईल. परंतु या प्रणालीचा फारसा काही फायदा झाला नाही. टोल नाक्यावर अजूनही असे अनेक वाहान चालक येतात, जे टोल भरायला मागत नाहीत किंवा भरत नाहीत आणि अशा लोकांमुळे देखील या टोल नाक्यांवरती वाहनांची गर्दी होते. सध्या असंच एक प्रकरण समोर आला आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून या घटनेचा खुलासा झाला. समोर आलेला हा व्हिडीओ टोल नाक्यावरील आहे. जेथे एक महिला टोल नाक्यावर एका वाहन चालकाला थांबवते आणि त्याच्याकडून टोलचे पैसे मागते. परंतु या उलट का चालक असं काही करतो, जे पाहून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. हे वाचा : कसं शक्य आहे? स्वतःच्या अंत्यसंस्कारात आली आणि सर्वांसोबत गप्पा मारू लागली; पाहा मृत महिलेचा LIVE VIDEO टोल बुथ बाहेर एक पांढरी कार उभी आहे, ज्यामधून एक व्यक्ती रागाने खाली उतरते आणि या महिलेच्या कानशिलात वाजवते. खरंतर या महिलेनं टोलचे पैसे मागितल्यामुळे या रागावलेल्या व्यक्तीने असं कृत्य केलं असल्याचं सांगण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

या महिलेनं देखील जराही विलंब न करता आपल्या पायातली चप्पल काढली आणि या व्यक्तीला मारण्यास सुरुवात केली. या व्यक्तीने पुन्हा या महिलेला कानशिलात मारलं. या लोकांमध्ये ही मारहाण सुरुच होती, त्यावेळेला तेथे आणखी एक व्यक्ती आणि महिला आली, जे हे प्रकरण हाताळण्यासाठी पुढे सरसावले. हे वाचा : आता फास्टॅगच काय, टोल नाकेही होणार हद्दपार, ‘या’ नव्या टेक्नॉलॉजीने होणार टोल वसुली!. एका मीडिया रिपोर्टनुसार, राजकुमार गुर्जर असं या व्यक्तीचं नाव आहे, जिने टोल नाक्यावरती अशी मारहाण सुरु केली. राजकुमार हा FASTag शिवाय आपले वाहन चालवत होता आणि व्यक्तीने दावा केला की तो स्थानिक आहे आणि त्यामुळे त्याला टोल भरण्यापासून सूट देण्यात यावी. पण ते सिद्ध करणारी कोणतीही कागदपत्रे त्याच्याकडे नव्हती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या