मुंबई, 09 जुलै : साप म्हटलं की माणसंच नव्हे तर कित्येक प्राण्यांनाही भीती वाटेत (Snake video viral). सापाला पाहताच सर्वजण पळून जातात. सापाच्या जवळ जाण्याची हिंमत कुणीच करणार नाही. पण एका मांजराने मात्र सापाशी पंगा घेतला आहे (Cat video viral). साप दिसताच मांजराने त्याच्यावर हल्ला केला. शिकार करायला आलेल्या सापाची मांजरानेच अक्षरशः वाट लावली आहे. वाघ आणि मांजराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. (Snake and cat video viral).मांजरीला वाघाची मावशी म्हटलं जातं, ते काही असंच नाही. ज्या सापाला सर्वजण घाबरतात त्याच्याशी ही वाघाची मावशी बिनधास्तपणे भिडली. साप मांजरीची शिकार करायला आला तेव्हा न घाबरता मांजरीने त्याचा सामना केला. मांजरीच्या या डेअरिंगचा नेमका काय परिणाम झाला तो तुम्हीच तुमच्या डोळ्यांनी पाहा. व्हिडीओत पाहू शकता मांजरीला पाहताच साप तिच्याजवळ येतो. तिच्यावर हल्ला करण्यासाठी तिच्यासमोर फणा काढून उभा राहतो. त्यावेळी मांजर आपाल एक हात उचलून त्याच्या तोंडावर आपला पंजा मारते. त्यानंतर साप शिकार सोडून स्वतःचा बचाव करण्यासाठी धडपडतो. स्वतःला स्वतःच्या विळख्यात घेतो. त्यानंतर मांजर त्याच्यावर पुन्हा पंजा मारते. साप मात्र काहीच प्रतिक्रिया देत नाही. साप काहीच करत नसल्याने ती लागोपाठ वार करत राहते. सापात काहीच हालचाल होत नसल्याचे हे नक्की काय आहे हे तपासण्यासाठी ती नाकाने वासही घेताना दिसते.
आता सापाच्या स्वभावानुसार त्याने पलटवार करणं अपेक्षित होतं. पण सापाची हिंमतच होत नाही. मांजराचं रूप पाहून तोच इतका घाबरला की तोंड आत घेऊन बसला आहे. सापासारख्या खतरनाक प्राण्यानेही साध्या मांजरीसमोर हार मानली आहे. व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. तिथं असलेल्या नागरिकांनी हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. bestpet.in नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. व्हिडीओ पाहून तुम्हाला काय वाटलं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.