JOIN US
मराठी बातम्या / Viral / चवताळलेल्या बैल हल्ला करण्यासाठी वेगात मागे धावू लागला अन्...; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

चवताळलेल्या बैल हल्ला करण्यासाठी वेगात मागे धावू लागला अन्...; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसतं जेफ दिनिकाओस याच्या मागून एक बैल येत आहे (Bull Attacks on Man Video). हा बैल खूप चिडलेला दिसतो

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 19 मार्च : सोशल मीडियावर सतत आपल्याला नवनवे व्हिडिओ पाहायला मिळतात. यात अनेक व्हिडिओ मजेशीर असतात. मात्र काही व्हिडिओ असे असतात जे पाहून काळजाचा ठोका चुकतो. हे व्हिडिओ अनेकदा धडकी भरवणारे आणि विचार करण्यास भाग पाडणारे असतात. सध्या अशाच एका घटनेचा बुल फायटिंग रिंगमधील एक व्हिडिओ ऑनलाईन अपलोड केला गेला आहे. बुल फाईट्स (Bull Fights) ही काही नवीन किंवा कधीही न ऐकलेली गोष्ट नाही. VIDEO - 3-3 कोब्रांसोबत तरुणाचा जीवघेणा खेळ; शेवटी जे घडलं ते पाहून घाम फुटेल ही स्पर्धा अतिशय भीतीदायक आणि खतरनाक असते. मात्र तरीही अनेक देशांमध्ये हा राष्ट्रीय खेळ आहे आणि प्रेक्षकही या खेळाचा आनंद लुटण्यासाठी उत्सुक असतात. बुलफाइटिंग हा काही लोकांसाठी एक व्यावसायिक खेळ आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये व्यावसायिक बुलफायटर जेफ दिनिकाओस दिसत आहे. हा खेळाडू आहे. गेममध्ये सहभागी झालेले त्याचे इतर व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम फीडवर पाहायला मिळतात. या व्हिडिओमध्येही त्याने बुलफाइटमध्ये भाग घेतला आहे.

संबंधित बातम्या

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसतं जेफ दिनिकाओस याच्या मागून एक बैल येत आहे (Bull Attacks on Man Video). हा बैल खूप चिडलेला दिसतो. हा व्हिडिओ पाहणाऱ्यांनाही या गेमच्या धोकादायकतेची कल्पना येते. बैल ज्याप्रकारे या व्यक्तीच्या मागे धावत आहे आणि बैलाच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी हा व्यक्ती ज्यापद्धतीने प्रयत्न करत आहे, ते पाहून कोणाचाही थरकाप उडेल.

Shocking video! पेटत्या होळीत व्यक्तीने मारली उडी, पुढच्याच क्षणी झाला चमत्कार

या व्हिडिओला सोशल मीडियावर 4 दशलक्षाहून अधिक लाईक्स आणि 7 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहून लोक घाबरले आहेत आणि व्हिडिओ लाइकही करत आहेत. प्रत्येकजण अशा प्रकारच्या खेळांमध्ये सहभागी होऊ शकत नाही. मात्र, असे व्हिडिओ पाहून याच्या भयानकतेचा अनुभव घेता येतो. याच कारणामुळे या व्हिडिओलाही भरपूर व्ह्यूज मिळत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या