JOIN US
मराठी बातम्या / Viral / फित कापताच नव्याकोऱ्या पुलाचे 2 तुकडे, उद्घाटन करणारे नेतेही पुलावरून कोसळले; Watch Video

फित कापताच नव्याकोऱ्या पुलाचे 2 तुकडे, उद्घाटन करणारे नेतेही पुलावरून कोसळले; Watch Video

उद्घाटनादिवशीच कोसळला नवाकोरा पूल. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल.

जाहिरात

पुलाच्या उद्घाटनादिवशी दुर्घटना.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ब्राझाव्हिल, 07 सप्टेंबर :  एखादा रस्ता बांधला की त्याला खड्डे पडणं, पावसाळ्यात पूल कोसळलणं किंवा एखादा जुना पूल कोसळणं अशी प्रकरणं नवी नाहीत. पण सध्या अशी घटना घडली आहे ज्यात अगदी नवाकोरा पूल कोसळला आहे. या पुलाच्या उद्घाटनाच्यादिवशीच तो पूल कोसळला. नेत्यांनी पुलावरील फित कापून त्याचं उद्घाटन करताच पुलाचे दोन तुकडे झाले. ही भयंकर दुर्घटना कॅमेऱ्यात कैद झाली. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. कोसळणाऱ्या पुलाच्या या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. कारण या पुलाचा वापर झालेला नसतानाही उद्घाटनादिवशीच ही घटना घडली. व्हिडीओत पाहू शकता एका पुलावर काही लोक उभे आहेत एक नेता पुलाचं उद्घाटन करत आहे. फित कापताच पूल तुटतो आणि पुलावरील नेत्यांसह सर्वच्या सर्व लोक पुलावरून धाडकन कोसळतात. स्थानिक न्यूज एजन्सी खामा च्या रिपोर्टनुसार डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगोतील अधिकारी आणि नेता एका पादचारी पुलाचं उद्घाटन करत आहेत. जशी पुलावरील फित कापतात तसे पुलाचे दोन तुकडे झाले. पुलावरील सर्वच्या सर्व लोक खाली कोसळले. हे वाचा -  टेलरने चुकीचे कपडे शिवले म्हणून ग्राहकाने कोर्टात घेतली धाव; पुढे काय घडलं पाहा सुदैवाने नदी फार मोठी नाही. छोटीशी नदी आहे. त्यामुळे कुणी पाण्यात गेल्याचं दिसत नाही. पुलाच्या मधोमध सर्वजण अडकले आहेत. एकेएक करून त्यांना पुलावरून बाजूला घेतलं जात आहे.

संबंधित बातम्या

आफ्रिकन पत्रकार होपवेल चिनोनोने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ट्विटर पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार ही घटना डेमोक्रेटिक रिपब्लक ऑफ कांगोमध्ये घडली आहे. गेल्या आठवड्यातील ही घटना आहे. हे वाचा -  फक्त 1000 रुपयांसाठी Ambulance driver चं Pregnant महिलेसोबत धक्कादायक कृत्य; संतापजनक VIDEO “तरुण हा खंड हा सोडून जात आहेत, हे यातून दिसून येतं. अयशस्वी नेतृत्वानंतर या दुर्घटनेनं आपलं जगात हसू केलं आहे”, असं या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या