नवी दिल्ली 03 फेब्रुवारी: सोशल मीडियावर सतत नवनवे व्हिडिओ व्हायरल होत राहतात. यातील काही व्हिडिओ हैराण करणारे असतात. तर काही व्हिडिओ इतके विनोदी असतात की ते पाहून हसू आवरणं कठीण होतं. यात विशेषतः लग्नसमारंभातील व्हिडिओ (Wedding Videos) मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात आणि यांना नेटकऱ्यांची विशेष पसंतीही मिळते. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात दिसतं की नवरीला तिच्या मैत्रिणी उचलून स्विमिंग पुलमध्ये फेकण्याचा प्रयत्न करत आहेत. यादरम्यान जे काही होतं, ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. स्टंट करण्यासाठी 2 कारच्या मधून घातली दुचाकी पण…; भीषण अपघाताचा LIVE VIDEO व्हायरल होणाऱ्या व्हि़डिओमध्ये (Funny Video of Bride) तुम्ही पाहू शकता की नवरीबाई आणि तिच्या मैत्रिणी स्विमिंग पुलच्या शेजारी उभा आहेत. त्यांच्या आसपास इतर काही लोकही दिसत आहेत. यादरम्यान मैत्रिणी नवरीचे हात आणि पाय कपडून तिला उचलतात आणि तिला स्विमिंग पुलमध्ये फेकू लागतात. मात्र, पुढच्याच क्षणी जे काही घडतं, ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. मैत्रिणी नवरीला स्विमिंग पुलमध्ये फेकतात मात्र इतक्यात त्यांच्यातील एकीचा तोल जातो आणि यानंतर सगळ्याच स्विमिंग पुलमध्ये कोसळतात.
हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर hepgul5 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. यूजरने व्हिडिओला कॅप्शन देत लिहिलं, हे अतिशय मजेशीर आहे. 30 जानेवारीला शेअर झालेला हा व्हिडिओ नेटकऱ्यांना खळखळून हसवत आहे. आतापर्य़ंत 28 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. हा आकडा वाढतच आहे. अनेकांनी व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत.
एका यूजरने व्हिडिओवर मजेशीर अंदाजात कमेंट करत लिहिलं, ‘जिच्या मैत्रिणीच अशा आहेत, तिला शत्रूंची गरजच काय आहे’ दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, ‘बहुतेक प्लॅनिंग बरोबर केलं नव्हतं’. आणखी एकाने लिहिलं, कोणाकोणाला आपले मित्र-मैत्रिणी आठवल्या. याशिवाय अनेकांनी यात आपल्या मित्रांना टॅग केलं आहे.