नवी दिल्ली, 07 जुलै : कोरोनामुळं अद्यापही लॉकडाऊन हटवण्यात आला नाही आहे. त्यामुळे लोकांचा सध्या घरातूनच काम करावे लागत आहे. कोरोनामुळं तब्बल 3 ते 4 महिने लोकं वर्क फ्रॉम होम करत आहेत. दुसरीकडे लॉकडाऊनमुळे लग्न समारंभही जास्त होत नाही आहेत. 50 लोकांच्या उपस्थितीतच लग्न समारंभ करण्याचा नियम असल्यामुळं अगदी साध्या पद्धतीनं विवाह सोहळे होत आहेत. मात्र एका अजब लग्नाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये लग्न सोडून एक वधू चक्क लॅपटॉप घेऊन काम करताना दिसत आहे. या व्हिडीओवर लोकांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. दिनेश जोशी नावाच्या ट्विटर युझरनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर त्यांनी, जर तुम्हाला तुमचं काम खूप वाटत असेल तर हा व्हिडीओ पाहा. वाचा- लॉकडाऊनमध्ये तेलात चिप्स तळत असताना अचानक आला विषारी धूर आणि…
या व्हिडीओमध्ये लग्न मंडपातच वधू लॅपटॉप आणि फोनवर काम करताना दिसत आहे. थोड्यावेळानं वर तिच्या बाजूला येऊन बसतो.
वाचा- VIDEO : मोठमोठ्या बॉ़डी बिल्डरना टक्कर देतेय ही 24 वर्षांची तरुणी हा व्हिडीओ कधीचा आणि कुठला आहे हे अद्याप कळू शकलेले नाही आहे. मात्र सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
काही युझरनं कामचं सगळं असतं अशी कमेंट केली आहे. तर काही युझरनं नातेवाईकांना टाळण्याचा चांगला पर्याय आहे, असे म्हटले आहे. वाचा- मायकल जॅक्सनचा पुनर्जन्म? मजुराचा हा डान्स VIDEO पाहून तुम्हीही व्हाल शॉक संपादन-प्रियांका गावडे.