JOIN US
मराठी बातम्या / Viral / लग्नात सप्तपदीआधी नवरीबाईची भलतीच डिमांड; Wedding video पाहून डोक्याला लावाल हात

लग्नात सप्तपदीआधी नवरीबाईची भलतीच डिमांड; Wedding video पाहून डोक्याला लावाल हात

लग्नात नवरी इतकी वैतागली ही सप्तपदीआधी करू लागली विचित्र मागणी.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 नोव्हेंबर : लग्नामध्ये (Wedding video) जितकी मौजमस्ती तितकाच थकवाही जाणवतो. नवरा-नवरीची (Bride groom video) तशी धावपळ तर नसते पण माणसांची गर्दी, आवाज, लग्नाचा वजनदार ड्रेस, दागिने, विधी यामुळे थकवा जाणवतो आणि जीव अगदी नकोसा वाटतो. अशाच सर्व परिस्थितीला वैतागलेल्या एका नवरीचा व्हिडीओ (Bride video) सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. जिने लग्नात भलतीच डिमांड केली आहे. नवरीचे सप्तपदी व्हायचे होते. सप्तपदी होण्याआधी तिने अशी काही मागणी केली की लग्नातील सर्वजण हैराण झाले. मागणी ऐकून तर तुम्हीही डोक्याला हात लावाल.

संबंधित बातम्या

हर्षिता रोहित शेट्टी नावाच्या महिलेने आपल्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. नवरीला नाइट सूटमध्ये फेरे घ्यायचे आहेत, असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे. हे वाचा -  मांडव बनला आखाडा, डीजेवरून पाहुण्यांमध्ये तुफान हाणामारी; पाहा राड्याचा VIDEO व्हिडीओत पाहू शकता एक नवरी नटून थटून लग्नाच्या ड्रेसमध्ये सोफ्यावर बसली आहे. ती खूप थकलेली दिसते आहे. त्यावेळी तिच्यासमोर असलेली तिची बहीण विचारते, दीदी तुला काय हवं आहे. त्यावर नवरीबाई चक्क नाइट सूट मागते. मग तिची बहीण तिला समजावते की अजून फोटोशूट होणं बाकी आहे. या व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहे. एका युझरने ही ओव्हरअॅक्टिंग असल्याचं म्हटलं आहे तर एकाने नाइट सूट सोडून आपला लग्नाचा दिवस एन्जॉय कर असं म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या