JOIN US
मराठी बातम्या / Viral / सप्तपदीसाठी वाट बघत होता नवरदेव; नवरी भलत्याच कामात मग्न, पाहून पाहुणेही थक्क, VIDEO

सप्तपदीसाठी वाट बघत होता नवरदेव; नवरी भलत्याच कामात मग्न, पाहून पाहुणेही थक्क, VIDEO

व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की लग्नाच्या वेळी नवरदेव ब्राह्मणासमोर बसलेला आहे. सप्तपदीसाठी तयारी सुरू आहे, मात्र नवरी तिथे आलेली नाही

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 27 फेब्रुवारी : भारतात सध्या लग्नाचा सीझन (Wedding Season) सुरू आहे. सोशल मीडियावर लग्नसमारंभातील अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. यातील काही व्हिडिओ असे असतात जे पाहूनच हसू आवरत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नवरी आणि नवरदेवाचा (Bride and Groom) आहे. हा मजेशीर व्हिडिओ (Funny Wedding Video) पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

‘बुढिया के बाल’साठी ही व्यक्ती घेते माणसांच्या डोक्यावरील केस; VIDEO VIRAL

हा व्हिडिओ पाहून अनेक लोक म्हणत आहेत, की अशी नवरी कधीही पाहिली नाही. या व्हिडिओमध्ये दिसतं की नवरी आपल्याच लग्नात असं काही करते जे पाहून नवरदेवासोबतच पंडीतही हैराण होतात. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा क्षण असतो. यादिवशी नवरी आणि नवरदेव लोकांचं लक्ष वेधण्याचा आणि मन जिंकण्याचा प्रयत्न करतात. दोघांना आपला हा खास दिवस एन्जॉयही करायचा असतो. हा व्हिडिओदेखील असाच आहे.

संबंधित बातम्या

व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की लग्नाच्या वेळी नवरदेव ब्राह्मणासमोर बसलेला आहे. सप्तपदीसाठी तयारी सुरू आहे, मात्र नवरी तिथे आलेली नाही. ब्राह्मण नवरीला बोलावतात मात्र नवरी येत नाही. नवरदेवही सप्तपदीसाठी नवरीची वाट पाहात राहातो. इतक्यात नवरी स्टेजवर दिसते आणि ती एकटीच डान्स करू लागते (Bride Dance Video). हे पाहून तिथे उपस्थित सगळेच आश्चर्यचकीत होतात.

बापरे! गाडीची खिडकी फोडून रस्त्यावर आली 8 फूट मगर आणि…; थरकाप उडवणारा VIDEO

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवरदेव मंडपात आपल्या नवरीची वाट बघत असतो आणि नवरी अगदी आनंदात डान्स करत असते. ब्राह्मणही हे पाहून आश्चर्यचकीत होतात. कारण नवरीबाई डान्समध्येच मग्न असते. इन्स्टाग्रामवर हा मजेशीर व्हिडिओ memecentral.teb नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी यावर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या