नवी दिल्ली, 6 मे : लग्नाच्या निमित्ताने वधू-वरांचे अनेक व्हिडिओ इंटरनेटवर पाहायला मिळत आहेत. इंटरनेट युजर्सकडूनही वधू-वरांच्या व्हिडिओंना मोठी पसंती मिळत असते. वधू आणि वर देखील त्यांच्या लग्नाच्या निमित्ताने खूप मजा करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नववधूने विचारलेला मजेदार प्रश्न या व्हिडीओमध्ये वधूने कॅमेऱ्यासमोर वराला असा प्रश्न विचारला, ज्यामुळे तो प्रथमच चक्रावून गेला. मात्र, नंतर वराने वधूच्या प्रश्नाला अतिशय मजेशीर उत्तर दिले. वधूने वराला विचारलेला प्रश्न ऐकून तेथे उपस्थित नातेवाईक आणि पाहुणे गोंधळून गेल्याचं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. तो काय उत्तर देतो, हे पाहण्यासाठी लोक वराकडे पाहू लागले. यानंतर वराने वधूला खूप गमतीशीर उत्तर दिलं, जे ऐकून वधूने असा काही चेहरा केला की, उपस्थितांमधून हास्याचे तुषार उडाले. नवरीने मंडपात तिच्या वराला जाहीरपणे विचारलं की, तुला लग्न का करायचं आहे? यावर वर हसत-हसत उत्तर दिलं, ‘कारण मला शांती नको आहे.’ वराकडून असे उत्तर ऐकून वधूनंही एकदम जबरदस्त लुक दिला. हे ऐकून सर्व पाहुणे आणि नातेवाईक जोरजोरात हसू लागले. व्हिडिओ पहा-
इन्स्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल हा मजेदार व्हिडिओ इंस्टाग्रामवर prashanth_bionic नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लोकांकडून खूप पसंती मिळत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 16 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. इंस्टाग्राम युजर्स या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत (Instagram Reels Video).