नवी दिल्ली 29 डिसेंबर : प्रत्येक जोडप्यासाठी लग्नाचा दिवस खूप खास असतो. तो अधिक अविस्मरणीय बनवण्यासाठी लोक मोठी तयारी करतात. मात्र, आता हे क्षण कॅमेऱ्यात टिपण्याचा नवा ट्रेंड आला आहे. प्री-वेडिंग फोटोशूटची क्रेज मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या फोटोशूटशी वधू-वरांच्या सुंदर आठवणी जोडल्या जातात. पण लग्नाच्या फोटोशूटदरम्यान एका जोडप्यासोबत असं काही घडलं की, ते पाहून लोक हसू लागले. लग्नात नवरा नवरीसह वऱ्हाड्यांचे वाजले बारा; कॅमेरामॅननं केलेली कृती चर्चेत व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वधू आणि वर कॅमेऱ्यासमोर रोमँटिक पोज देत आहेत. यादरम्यान कॅमेरामन वराला वधूचा हात धरून नाचण्यास सांगतो. मात्र, वराने वधूचा हात धरून तिला फिरवण्याचा प्रयत्न करताच तोल जाऊन तो वधूसह जमिनीवर पडला. आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स नवरदेवाची खिल्ली उडवत आहेत. हा व्हिडिओ अतिशय मजेशीर आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर jaipur_weddings नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. 15 डिसेंबर रोजी अपलोड केलेला हा व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. ही बातमी देईपर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. त्याचबरोबर अनेकांनी यावर कमेंट करत आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.. पापा की परींचा स्कूटी चालवताना असा प्रकार, अखेर स्वत:चं तोंड करुन घेतलं काळं, पाहा Video एका यूजरने कमेंट करत लिहिलं, की जेव्हा नवरी अतिशय जड लेहंगा घालते, तेव्हा असंच होतं. दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, की लग्नाच्या दिवशी कोणासोबतही असं होऊ नये. आणखी एकाने मजेशीर प्रश्न विचारत म्हटलं, की या घटनेनंतर नवरदेव जिवंत राहिला का? इतरही अनेकांनी यावर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.