JOIN US
मराठी बातम्या / Viral / लपाछपी खेळत दुसऱ्याच देशात पोहचला मुलगा, 6 दिवसांनी सापडला अशा अवस्थेत

लपाछपी खेळत दुसऱ्याच देशात पोहचला मुलगा, 6 दिवसांनी सापडला अशा अवस्थेत

लहान वयात मुलं अनेक वेगवेगळे खेळ असतात. आपल्या शाक दोस्तांसोबत वेळ घालवत असतात. मात्र कधी कधी खेळ खेळताना लक्ष न दिल्यामुळे काही वाईट गोष्टीही घडतात.

जाहिरात

व्हायरल

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 30 जानेवारी : लहान वयात मुलं अनेक वेगवेगळे खेळ असतात. आपल्या शाक दोस्तांसोबत वेळ घालवत असतात. मात्र कधी कधी खेळ खेळताना लक्ष न दिल्यामुळे काही वाईट गोष्टीही घडतात. लहान मुलांनी खेळता खेळता भलतंच काही केल्याच्या अनेक घटना आत्तापर्यंत समोर आल्या आहेत. अशीच काहीशी घटना सध्या समोर येत आहे. एक मुलगा खेळता खेळता दुसऱ्याच देशात पोहचला. या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा होताना पहायला मिळत आहे. एक 15 वर्षाचा मुलगा खेळता खेळता दुसऱ्याच देशाच पोहचला. ही घटना बांग्लादेशमधील चितगावची आहे. फहीम नावाचा मुलगा आपल्या मित्रांसोबत चितगावच्या बंदरांध्ये लपा-छपी खेळत होता. खेळ खेळताना मुलाने स्वतःला एक शिपिंग कंटनेरमध्ये बंद केलं. जोपर्यंत त्याला जाग येते तोपर्यंत तो मलेशिया पोहोचला होता. या गोष्टीची नाही त्याच्या कुटुंबाला माहिती होती नाही तेथे काम करणाऱ्या कोणाला. मात्र जेव्हा मलेशियाच्या बंदरावर कंटेनर खोलण्यात आला तेव्हा त्याला पाहून सगळ्यांना धक्काच बसला. चौकशीदरम्यान तो बांगल्यादेशमधील असल्याचं समोर आलं. हेही वाचा -  ऐकावं ते नवल! खरं प्रेम शोधण्यासाठी मुलीने लढवली शक्कल; केलं असं काही बसणार नाही विश्वास 11 जानेवारी रोजी बेपत्ता झालेला फहीम 17 जानेवारीला मलेशिया बंदरावर सापडला. मलेशियाच्या बर्नामा वृत्तानुसार, मलेशियाचे गृहमंत्री दातुक सेरी सैफुद्दीन नस्युशन इस्माइल यांनी सांगितलं की, असं समोर आलं की मुलगा कंटेनरमध्ये शिरला आणि तेथेच झोपी गेला. कंटेनरमध्ये आठवडाभर उपाशी राहिला. न काही खाता न काही पिता तो सहा दिवस कंटेनरमध्ये होता. त्यामुळे तो खूप अशक्त झाला होता आणि त्याला तापही आला होता. कंटेनरमधून बाहेर काढल्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

दरम्यान,  पोलिसांना सुरुवातीला हे मानवी तस्करीचं प्रकरण वाटलं. मात्र नंतर चौकशीनंतर सत्य समोर आलं. ही घटना सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या