बस दरीत कोसळून 37 प्रवाशांचा जागेवर मृत्यू

 पाकिस्तानातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली.

29 जानेवारीला पहाटे दक्षिण-पश्चिम पाकिस्तानमधील लासबेला जिल्ह्यातील बेला भागात हा अपघात झाला.

प्रवासी बस रस्त्यावरून घसरली आणि दरीत कोसळली. 

या अपघातात 37 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे.

बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, बस वेगात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

 खड्ड्यात पडल्यानंतर बसला आग लागल्याने क्षणात होत्याच नव्हत झाले. 

बसमध्ये 48 प्रवासी होते, बचाव कार्य सुरू असून जखमींना बाहेर काढले जात आहे.

अग्निशमन दलाचे जवान, बचावकर्ते आणि सुरक्षा कर्मचारी अपघातस्थळी उपस्थित आहेत.