JOIN US
मराठी बातम्या / Viral / एक नंबर! फक्त 60 सेकंदात 'या' भारतीयानं साऱ्या जगाला शिकवलं फिजिक्स, पाहा VIDEO

एक नंबर! फक्त 60 सेकंदात 'या' भारतीयानं साऱ्या जगाला शिकवलं फिजिक्स, पाहा VIDEO

फक्त 60 सेकंदात फिजिक्स? खर नसेल वाटत तर हा व्हिडीओ एकदा पाहाच.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 4 जुलै: भौतिकशास्त्र म्हणजेच Physics हा सर्वात कठीण विषय मानला जातो. मात्र तुम्हाला जर कोणी 60 सेकंदात फिजिक्स शिकवलं तर? विश्वास बसणार नाही ना? पण एक4 भारतीय अवलियाने हे करून दाखवलं आहे. सध्या सोशल मीडियावर या मुलाचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. Physics & Astronomy Zone या ट्विटर अकाउंट वरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यात हा मुलगा दोन ग्लासमध्ये पाणी भरून करामती करत आहे. तो पाण्याचा ग्लास हवेत दोरीने उडवतो, तरी ग्लासातून पाणी बाहेर पडत नाही. त्याच्या याच कलाकारीवर सध्या दुनिया फिदा आहे.

एका ट्विटर युझरनं दिलेल्या माहितीनुसार, हा मुलगा चेन्नईमधील कन्नगी नगरमध्ये राहतो. वाचा- काय सांगता? या ATM मशीनमधून निघते चक्क तयार केलेली पाणीपुरी, काय आहे प्रकार वाचा

संबंधित बातम्या

या अवलियाचे नाव सारार्थ असून, तो जवळच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लहान मुलांना विज्ञान शिकवण्याचे काम करतो. इन्स्टाग्रामवरही तो खूप प्रसिद्ध आहे. काही व्हिडीओमध्ये तो हातात टोमॅटो घेऊन स्टंट करताना दिसत आहे.

जाहिरात

10 लाखांहून अधिक लोकांनी सोशल मीडियावर या मुलाचे व्हिडीओ पाहिले आहेत. सारार्थ हा आपल्या विचित्र स्टंटसाठी ओळखला जातो. सध्या सोशल मीडियावर त्याच्या स्टंटचेही फोटो व्हायरल होत आहेत. वाचा- VIDEO : समुद्र किनाऱ्यावर सुरू होतं Wedding Photoshoot, एक लाट आली आणि… संपादन-प्रियांका गावडे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या