JOIN US
मराठी बातम्या / Viral / Reels करणाऱ्या मुलाला बस चालकाने शिकवली चांगलीच अद्दल, Video सोशल मीडियावर व्हायरल

Reels करणाऱ्या मुलाला बस चालकाने शिकवली चांगलीच अद्दल, Video सोशल मीडियावर व्हायरल

तरुणानं Reels बनवण्यासाठी आखला प्लान, पण बस चालक त्याहून हुशार, तरुण पुढे जाताच… हा व्हिडीओ पाहून पोटधरुन हसाल

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 18 जानेवारी : सोशल मीडियावर नेहमीच काही मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ आपलं मनोरंजन करतात आणि आपल्याला पोटधरुन हसायला भाग पाडतात. म्हणूनच तर हे व्हिडीओ स्क्रोल करण्यात लोकांचा वेळ कसा निघून जातो हे त्यांचं त्यांनाच कळत नाही. हे व्हिडीओ बनवण्यासाठी अनेक लोक मेहनत करतात. पण कधी-कधी लोक हे व्हिडीओ बनवण्यासाठी कोणत्याही थराला जातात. ज्यामुळे कधीकधी ते स्वत: अडकतात. तर काही लोक दुसऱ्यांसाठी देखील समस्या तयार करतात. हे ही पाहा : Reel करणाऱ्या मुलांनी बस ड्रायव्हरला बनवलं मूर्ख, Video सोशल मीडियावर व्हायरल सध्या यासंबंधीत एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एका तरुणाने रिल्स बनवण्याचा प्रयत्न केला पण तो एका बस चालकाने हानून पाडला आहे. हा तरुण जेव्हा आपलं रिल्स बनवण्यासाठी बस चालकाला फसवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा हा बसचालक त्याच आपल्या शैलीत धडा शिकवतो. हा व्हिडीओ तसा मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये सुरुवातील एक मुलगा बस स्टँडवर उभा असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. तो बसची वाट पाहत आहे. तेवढ्यात समोरून बस येते. बस पाहून तो तिला थांबवण्यासाठी पुढे हात करतो आणि बस ड्रायव्हरला थांबण्याचा इशारा करतो. बसचालकही बस थांबवतो. बसचे दरवाजे उघडताच हा तरुण बसमध्ये चढू लागतो. मात्र, चढताना तो एक पाय बसच्या दरवाज्यावर ठेवतो आणि आपल्या बुटाचे लेस बांधू लागतो. बस काही सेकंद थांबतो. पण ते तरुण खूपवेळ आपल्या शुजचे लेस बांधत असतो, तेव्हा बस चालकाला या मुलाचा खेळ लक्षात येतो आणि तो खूप चिढतो.

संबंधित बातम्या

अखेर चिढलेला बस चालक आपल्या बसचा दरवाजा बंद करतो, ज्यामुळे या तरुणाचा पाय या दरवाजातच अडकतो. हा तरुण पाय वारंवार काढण्याचा प्रयत्न करतो पण त्याला पाय काढणं शक्य होत नाही आणि हा व्हिडीओ इथेच संपतो. बस चालकाने तरुणासोबत केलेला हा प्रकार पाहून असं तर लक्षात येत आहे की तरुणाला त्याची चूक समजली असावी. हे ही पाहा : Desi Jugad : उंदरांचा त्रास कायमचा संपवण्यासाठी तरुणानं लढवलं शक्कल, पाहा Video हा व्हिडीओ ‘इन्स्टंट कर्मा’ नावाच्या युजरने सोशल मीडिया ट्विटरवर शेअर केला आहे. ज्याला लाखो लाईक्स आणि कमेंट्स आहेत. या व्हिडीओवर लोकांनी आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या तरुणाच्या वागण्याची टिका केली आहे तर काहींनी बस चालकाच्या वागण्याला क्रुर म्हटलं आहे. आपल्या मनोरंजनासाठी एखाद्याला त्रास देणं हे कितपत योग्य आहे? असा प्रश्न हा व्हिडीओ पाहून अनेकांनी उपस्थीत केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या