नवी दिल्ली 31 मार्च : प्रेम हे कधीही आणि कोणावरही होऊ शकतं. ते वेळ, काळ, लोक, वय, धर्म हे सगळं पाहून होत नाही. म्हणूनच प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. नुकतंच एका व्यक्तीने हेच सिद्ध केलं की प्रेमात असताना माणसाला खरंच इतर कोणत्याही गोष्टींचं घेणं-देणं नसतं (Weird Love Story). याच कारणामुळे या व्यक्तीने आपल्या मित्राच्या लग्नात चक्क नवरीबाईलाच प्रपोज केलं (Groom’s Friend Proposed Bride on Wedding Stage). लग्नादरम्यान बेस्ट मॅन बनलेला हा व्यक्ती वेडिंग स्पीच देण्यासाठी स्टेजवर पोहोचला तेव्हा त्याने असं काही बोललं, जे ऐकून तिथे उपस्थित असलेले सर्वजण थक्क झाले. या घटनेचा त्यावेळी नववधू असलेल्या डेझीरी व्हाईटने स्वतः खुलासा केला आहे. 32 वर्षीय Desiree White हिचं 2010 साली लग्न झालं होतं आणि त्यावेळी तिच्या होणाऱ्या पतीच्या मित्राने लग्नाच्या भाषणात तिला जाहीरपणे प्रपोज केलं होतं. ‘सिगारेट-दारू सोडा नाहीतर घराबाहेर पडा’, बायकोने धमकी देताच नवऱ्याने घेतला शॉकिंग निर्णय डेली मेलच्या रिपोर्टनुसार, इव्हेंट प्लॅनर म्हणून काम करणाऱ्या डेझीरी व्हाईटचं लग्न होणार होतं आणि त्यावेळी ब्रायंट नावाची व्यक्ती तिच्या होणाऱ्या पतीसोबत बेस्ट मॅन म्हणून उपस्थित होती. पार्टीत जास्त मद्यपान केल्यानंतर नवरीला पाहताच ब्रायंटला आपलं प्रेम व्यक्त करण्याची इच्छा झाली. यानंतर लग्नात स्टेजवर जाऊन स्पीच देण्यासाठी सांगताच, तो आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही. ब्रायंट म्हणाला - ‘मला अजूनही आठवतं जेव्हा मी डिझीरीला पहिल्यांदा पाहिलं आणि मी तिच्या प्रेमात पडलो. मला माहिती होतं की ती माझीच असणार आहे. आतापर्यंत आयुष्यात मी जितक्या लोकांना भेटलो, त्या सर्वांमध्ये ती सगळ्यात खास आहे. जेव्हा मला कळलं की तिला बॉयफ्रेंड आहे, तेव्हा मी विचार केली की आता मला काहीतरी करावं लागेल. मात्र, मी तिच्या प्रियकराला भेटलो आणि आमची मैत्री झाली. मी आता तुम्हा दोघांवर प्रेम करतो - अभिनंदन’ खांद्यावर टॅटू गोंदवण्यासाठी गेलेली तरुणी; आर्टिस्टने केलेला कांड पाहून संतापली डेझीरी व्हाईट पुढे सांगते, की त्या दिवशी तिने ब्रायंटशी लग्न केलं नाही आणि तिच्या प्रियकराशीच लग्न केलं. परंतु हे नातं फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या वर्षभरानंतर 2010 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तिने 2012 मध्ये ब्रायंटशी लग्न केलं. त्यांना आता 4 मुलंही आहेत आणि ते मिळून त्यांची सगळी कामं सांभाळतात. डेझीरीने असंही सांगितलं की तिचा नवरा आणि आधीचा पती हे दोघंही आता चांगले मित्र आहेत.