JOIN US
मराठी बातम्या / Viral / एका फोटोसाठी बापानं लेकाला खोल दरीमध्ये लटकवलं! धक्कादायक VIDEO VIRAL

एका फोटोसाठी बापानं लेकाला खोल दरीमध्ये लटकवलं! धक्कादायक VIDEO VIRAL

फोटो काढण्यासाठी एवढा धोका, हद्याचे ठोके चुकवणारा हा VIDEO एकदा पाहाच.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीजिंग, 14 जुलै : सोशल मीडियावर लाईक्स, शेअर मिळण्यासाठी लोकं कोणत्यासाठी स्थरावर जातात. यासाठी बरेच लोकं जीवाचा धोका पत्करून खतरनाक फोटो आणि व्हिडीओ काढतात. असाच एक भयंकर व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क एका वडीलांनी आपल्या मुलाला खोल दरीत लटकवलं, का तर त्यांना फोटो काढायचा होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या वडीलांवर टीका केली जात आहे. फोटो काढताना थोडीशी चुक झाली असती तरी, हे लहान मुलं दरीत पडलं असतं. त्याला दुखापतही झाली असती, किंवा जीवही गेला असता. हद्याचे ठोके चुकवणारा हा व्हिडीओ आतापर्यंत 13 लाख लोकांनी पाहिला आहे. वाचा- रस्त्यावर बसून वाघाने मारली डरकाळी, गाडीतील लोकांची झाली अशी अवस्था; पाहा VIDEO

वाचा- कधी होणार रस्ते? लाकडाला झोळी करून आजोबांना नेले दवाखान्यात, रत्नागिरीतला VIDEO या व्हिडीओमध्ये वडील आपल्या मुलाला हाताला धरून दरीत लटकवताना दिसत आहेत. तर दुसरा माणूस त्यांचा फोटो काढत आहे. इतर लोकं या दोघांकडे बघत आहे. या मुलाची आईही मागे उभी आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर फोटो काढण्यासाठी जीवाचा धोका पत्करणाऱ्या अशा लोकांवर टीका केली जात आहे. वाचा- पत्नीनं पतीला गर्लफ्रेंडसोबत रंगेहात पकडलं, गाडीच्या बोनेटवर चढून केला राडा मीडिया रिपोर्टनुसार, या व्हिडीओमध्ये दिसत असलेली दरी बीजिंगमधील हॉंगजिंग रोडवरची आहे. हा रोड डेविल्स रोड म्हणून ओळखला जातो. हा रस्ता एवढा धोकादायक आहे की, यावर तब्बल 18 वळणं आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या