नवी दिल्ली 27 एप्रिल : व्यक्तीची परिस्थिती आणि त्याच्या राहणीमानावरुन आपण त्याचा हेतू आणि स्थितीचा अंदाज लावू शकत नाही. याचाच प्रत्यय देणारी एक घटना समोर आली आहे. यात मंदिराबाहेर बसून भीक मागणाऱ्या महिलेनंच मंदिरात एक लाख रुपये दान केले आहेत (Beggar Woman Donated Money for Temple). तिने वर्षानुवर्षे अन्नदानासाठी लोकांकडे भीक मागितली आणि नंतर ही रक्कम मंदिराला दान केली (Woman Donates 1 Lakh Collected by Alms). अजब प्रकरण! घरात दररोज पडायचे गोल्फ बॉल; कोर्टात केस करताच करोडपती झालं हे जोडपं कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कांचीगुडू गावात राहणारी अश्वथामा नावाची महिला सणांच्या काळात मंदिराबाहेर भीक मागू लागली. ती गेल्या 18 वर्षांपासून हे करत आहे आणि हे पैसे ती मंदिरांना दान करते. महिलेनं यंदा आपली जमा झालेली १ लाखाची रक्कम बंटवाल येथील राजराजेश्वरी मंदिरात दान केली आहे. अश्वथामा नावाच्या महिलेने आपल्या पतीच्या निधनानंतर नाईलाजास्तव भीक मागायला सुरुवात केली. गेल्या 18 वर्षांपासून ती हेच काम करत आहे. अशा प्रकारे मिळालेल्या पैशातून ती स्वतःसाठी थोडी रक्कम ठेवते आणि उरलेली रक्कम बँकेत जमा करते. जेव्हा हा पैसा लाखो रुपयांपर्यंत पोहोचतो तेव्हा ती हे पैसे दान करते. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, राजराजेश्वरी मंदिराच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा तिचा मार्ग आहे. तर अश्वथामा यांच्या म्हणण्यानुसार, त्या समाजातून मिळालेले पैसे समजालाच दान करतात आणि त्यांची प्रार्थना आहे, की कोणीही उपाशी राहू नये. 7 वर्षांनंतर परत मिळालं हरवलेलं पाकीट; उघडून बघताच बसला आश्चर्याचा धक्का ही पहिली वेळ नाही, जेव्हा 80 वर्षीय वृद्ध महिला अश्वथामा यांनी मंदिराला दान दिलं आहे, यापूर्वीही अनेकदा त्यांनी पैसे दान केले आहेत. त्यांनी यापूर्वी साळीग्राम येथील श्री गरुणसिंह मंदिराला एक लाख रुपये, तर पोलोई येथील श्री अखिलेश्वर मंदिरात अय्यप्पाच्या भक्तांसाठी दीड लाख रुपये दान केले होते. त्यांनी गंगोली येथील एका मंदिरात लाखो लोकांना अन्नदानही केलं होतं. इतकेच नाही तर त्या उडुपी आणि दक्षिण कन्नड येथील अनाथाश्रमांनाही देणगी देतात.