नवी दिल्ली 18 डिसेंबर : साप हा एक असा जीव आहे ज्याच्या जवळ जाणं तर दूरच, मात्र त्याचं नाव ऐकूनही अनेकांना घाम फुटतो. अशात हा साप अतिविषारी असेल तर मग विचारालाच नको. सोशल मीडियावरही सापांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत राहतात. यातील काही साप असे असतात जे दिसायला अतिशय सुंदर असतात. मात्र यांच्या सौंदर्यामागे त्यांचा विषारीपणा (Venomous Snake) लपलेला असतो. सध्या अशाच एका सापाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Snake Video Viral on Social Media) होत आहे. या सापाचं सौंदर्य़ पाहून नेटकरीही फिदा झाले आहेत. Birthday आहे मालकाचा! कुत्र्याचं सेलिब्रेशन पाहून अवाक व्हाल; पाहा VIDEO ट्विटरवर हा व्हिडिओ आयएफएस ऑफिसर प्रवीण कासवान यांनी शेअर केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार या सापाचं नाव ब्रँडेड क्रेट (Branded Crate Snake Video) असं आहे. हा साप भारतातीलच एका भागात दिसला आहे. दिसायला हा साप अतिशय सुंदर असतो. मात्र हा अतिशय विषारी असतो. हा साप अतिविषारी सापांमधील एक आहे.
व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की हा साप सरपटत कुठेतरी निघाला आहे. त्याचं सौंदर्य कोणालाही भुरळ घालणारं आहे. आयएफएस प्रवीण कासवाने यांनी हा व्हिडिओ शेअर करत लोकांना विचारलं की कोणाला हा साप माहिती आहे का . तरुणाने भररस्त्यात तरुणींना करायला लावलं असं काम; VIDEO पाहून तुम्हीही शॉक व्हाल यानंतर त्यांनीच याबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितलं की या सापाचं नाव ब्रँडेड क्रेट आहे. हा अतिशय जीवघेणा साप आहे. हा भारतात आढळून आला आहे. मात्र या सापापासून दूर राहायला हवं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 52 हजारहून अधिकांनी पाहिला आहे.