हिच्या सौंदर्याला भुलू नका. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम व्हिडीओ स्क्रिनशॉट)
मुंबई, 15 जानेवारी : सोशल मीडियावर असे बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात जे पाहिल्यानंतर त्यावर विश्वास बसत नाही. हे खरंच असं आहे का? असा प्रश्न पडतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एका सुंदर तरुणीचा हा व्हिडीओ आहे. तरुणी इतकी सुंदर आहे की तिला पाहताच कुणीही तिच्याकडे आकर्षित होईल. तरुणी व्हिडीओतून तुम्हाला स्वतःकडे आकर्षित करण्याचा प्रयत्नही करेल. पण व्हिडीओच्या शेवटी तरुणीचं खतरनाक रूप आहे. व्हिडीओत पाहाल तरुणी फ्रंट कॅमेरा ऑन करून आपला व्हि़डीओ बनवते आहे. स्वतःच स्वतःचं शूट करते. तर गोरा वर्ण, घारे डोळे, गुलाबाच्या पाकळीसारखे नाजूक ओठ, गोड हसू… तरुणीचं सौंदर्य पाहून कुणीही तिच्या प्रेमात पडेल. त्यात ही तरुणी हातांनी इशारे करत प्रेमाने तुम्हाला तिच्याजवळ बोलावते. तुम्ही तिच्यात पूर्णपणे गुंतून जाता. प्रत्यक्षात नाही पण नजरेने तुम्ही तिच्या मागे मागे धावता. हे वाचा - स्पाइसजेटचा कविमनाचा पायलट; खास शैलीतल्या अनाउन्समेंटचा व्हिडिओ व्हायरल तरुणी कॅमेऱ्यासह दुसऱ्या बाजूला सरकताना दिसते. जशी ती जागा बदलते तसतसं तिच्यावरील प्रकाश कमी होतो आणि अंधार वाढत जातो. सोबत तिचं रूपही बदलतं. शेवटी ती घरातील एका अंधाऱ्या ठिकाणी जाते. तिथं तिचं खरं रूप पाहून तुम्ही हादरूनच जाल. यावेळी तरुणीचे फक्त डोळे चमकताना दिसतात तिचा चेहरा पूर्ण काळा दिसतो. सुरुवातील गोड वाटणारं या तरुणीचं हसूही भयावह वाटतं. आपल्या डोळ्यादेखत ही तरुणी भूत बनते. हे वाचा - नवरीने लग्नात बोलावले तिचे 5 एक्स बॉयफ्रेंड, पुढे जे घडलं….. @amrit96966 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला ते आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.