JOIN US
मराठी बातम्या / Viral / कारमध्ये घुसण्याच्या प्रयत्नात होतं अस्वल, अचानक असं काय झालं की प्राण्यानं ठोकली धूम? पाहा VIDEO

कारमध्ये घुसण्याच्या प्रयत्नात होतं अस्वल, अचानक असं काय झालं की प्राण्यानं ठोकली धूम? पाहा VIDEO

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे अस्वल कारचा दरवाजा उघडून आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत आहे. हे पाहून तिथे उभा असलेली मुलं जोरजोरात ओरडू लागतात.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 01 जानेवारी : अस्वल हा जंगलातील सर्वात भयानक प्राण्यांपैकी एक मानला जातो. त्याच्यात सिंहाचा सामना करण्याचीही ताकद आहे. काही वेळा त्यांच्या मोठ्या पंजे आणि नखांमुळे ते सिंहापेक्षाही वरचढ ठरतात. त्यांना झाडांवर सहज चढता येतं. अशा परिस्थितीत एखादा माणूस जंगलात अडकला आणि अस्वलाच्या तावडीत सापडला तर त्याचं जगणं कठीण होऊन बसतं. अस्वलाला मध जरी जास्त आवडत असला तरी प्रत्यक्षात हे प्राणी मांसाहारी असतात. 3 सिंहिणींनी मगरीला घेरुन अचानक केला हल्ला, पण..; शेवटी कोण जिंकलं? पाहा VIDEO याच कारणामुळे लोकांना अस्वलापासून दूर राहण्याचा सल्ला दिा जातो. सध्या अशाच एका अस्वलाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो मजेशीरही आहे आणि हैराण करणाराही आहे. यात एक अस्वल मानवी वस्तीत फिरताना दिसतो आणि पार्किंगमध्ये उभा असलेल्या कारमध्ये घुसण्याचा प्रयत्न करू लागतो. मात्र पुढे असं काही होतं की अस्वल अगदी वेगात जंगलाकडे धावतं.

संबंधित बातम्या

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे अस्वल कारचा दरवाजा उघडून आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत आहे. हे पाहून तिथे उभा असलेली मुलं जोरजोरात ओरडू लागतात. यामुळे अस्वल घाबरतं आणि आपल्याला कोण घाबरवत आहे हे पाहण्यासाठी इकडे तिकडे बघू लागतं. यावेळीही मुलांचं ओरडणं सुरूच राहातं. अखेर घाबरून अस्वल तिथून पळ काढतं आणि जंगलाकडे जातं. सुदैवाने या अस्वलाने कोणावरही हल्ला केला नाही. अवघ्या 4 सेकंदामध्ये वाघाने केला हत्तीवर बसलेल्या माहुतावर हल्ला, धडकी भरवणारा VIDEO हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @BornAKang नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 18 सेकंदाच्या या व्हिडिओला आतापर्यंत 6.7 मिलियन म्हणजेच 67 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर लाखो लोकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे. लोक या व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या