नवी दिल्ली 15 नोव्हेंबर : तुमच्या बँक (Bank) खात्यात अचानक करोडो रुपये जमा झाले, तर काय होईल? तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. तुम्ही याची माहिती तुमच्या बँकेला दिल्यानंतर बँकेने हे पैसे तुमचेच असल्याचे सांगितल्यावर मात्र तुम्ही आनंदाने उड्या मारायला लागाल. ब्रिटनमध्ये (UK) राहणाऱ्या एका व्यक्तीच्या (British Man) बाबतीत असाच काहीसा प्रकार घडला. त्याच्या बँक खात्यात अचानक जवळपास एक कोटी रुपये आले. विशेष म्हणजे त्या व्यक्तीने ते सर्व पैसे खर्चही केले; पण आता बँक हे पैसे व्याजासह परत मागत असल्यामुळे संबंधित व्यक्तीसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. ‘झी न्यूज’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसमोर बँकेच्या चुकीमुळे मोठं संकट उभं राहिलं आहे. बँकेत त्याच्या खात्यावर जे पैसे जमा झाले होते, ते त्याने स्वतःचे समजून आलिशान घर घेतलं. ती रक्कम आता बँकेने व्याजासह परत मागितली आहे. त्यामुळे आता काय करावं, हे त्या व्यक्तीला समजत नाही. दुसरीकडे बँकेने ‘सॉरी’ म्हणत आपली जबाबदारी झटकली आहे. चोरी करण्यासाठी घरात शिरला पण सुंदर महिला दिसतात बदललं चोराचं मन आणि मग… ‘मेल ऑनलाइन’च्या वृत्तानुसार, नॉरफोक (Norfolk) येथे राहणाऱ्या रसेल अलेक्झांडर यांच्या (Russell Alexander) खात्यात सुमारे 1 लाख 10 हजार पौंड म्हणजे जवळपास 1 कोटी 9 लाख रुपये इतकी रक्कम जमा झाली. जेव्हा त्यांना खात्यात इतकी मोठी रक्कम जमा झाल्याचा मेसेज मिळाला, तेव्हा त्यांना धक्का बसला. ते लगेच बँकेत गेले आणि याबाबत सांगितलं. तिथे त्यांना सांगण्यात आलं की, ही रक्कम त्यांना वारसा हक्काने मिळाली आहे. त्यामुळे ही रक्कम ते खर्च करू शकतात. हे ऐकून रसेल यांना खूप आनंद झाला. त्यांनी ही रक्कम वापरून एक आलिशान घर विकत घेतलं; पण आता त्यांना बँक व्याजासह पैसे परत मागत असल्यामुळे त्यांच्यासमोर संकट उभं राहिलं आहे. नेमकं काय झालं? 29 डिसेंबर 2020 रोजी रसेल यांच्या खात्यात 30,000 पौंड जमा करण्यात आले. यावर त्यांनी बँकेच्या वेबसाइटवरच्या चॅट सर्व्हिसशी संपर्क साधला; मात्र बँकेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. काही वेळाने पुन्हा त्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर त्यांनी बँकेत फोन केला. तेव्हा बँकेच्या अधिकाऱ्याने त्यांना सांगितलं, की हे पैसे थेट वारसा हक्कासारखे मिळाल्याचं दिसत आहे. त्यामुळे ते वापरू शकता. यानंतर रसेल आणि त्याच्या जोडीदाराने 2,37,500 पौंड म्हणजेच जवळपास 2 कोटी 36 लाख रुपयांचं नवीन घर घेतलं. हे घर खरेदीसाठी पैसे कमी पडत असल्यामुळे त्यांनी त्यांचं जुनं सात बेडरूम्सचं घरदेखील विकलं. ग्राहकाने 1192 KM वरुन जेवण मागवत ठेवली विचित्र अट, डिलिव्हरी बॉयचं भन्नाट उत्तर साधारण 9 महिन्यांनंतर बँकेला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि बँकेने 54 वर्षीय रसेल यांना व्याजासह सगळे पैसे परत करण्यास सांगितलं आहे. बँकेचं म्हणणे आहे की, ‘कोणी तरी चुकून रसेलच्या खात्यात पैसे जमा केले होते, त्यामुळे आता त्यांना ते पैसे परत करावे लागतील.’ रसेल यांनी आरोप केला आहे, की ‘बँकेने घरही जप्त केलं असून, मला आता अत्यंत लहान घरात राहावे लागत आहे.’ ते म्हणाले, ‘माझ्या खात्यात एक कोटी जमा झाले नसते तर मी कधीही नवीन घर घेतलं नसतं. बँकेच्या एका चुकीने माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. बँक मला नुकसानभरपाई म्हणून 500 पौंड देऊ करत आहे, जी रक्कम अंत्यत तुटपुंजी आहे.’ रसेल 40 वर्षं या बँकेचे खातेदार आहेत. अचानक बँक खात्यात करोडो रुपये जमा झाल्याने व बँकेनेदेखील ते पैसे तुमचेच असल्याचे सांगत खर्च करण्यास परवानगी दिल्यास कोणालाही आनंद होणे साहजिकच आहे; पण रसेल यांच्या बाबतीत हा आनंद फार काळ टिकला नाही.