नवी दिल्ली, 26 जुलै: साधूंची वस्त्र परिधान केलेल्या तरुणासोबत वाद घालणाऱ्यांना धडा शिकवण्याचे प्रकार हे अनेकदा सिनेमात पाहायला मिळतात. हे दृश्य प्रत्यक्षात घडल्याचं पाहायला मिळालं आहे. साधूची वस्र परिधान केलेल्या या तरुणानं उरलेल्या तीन पैलवानांचा धोबीपछाड केल्याचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. साधू-संत समजून तीन पैलवानांनी कुस्तीच्या प्रांगणात आलेल्या तरुणासोबत अरेरावीची भाषा करत वाद घातला. पैलवानांनी हात उचलला खरा पण साधूच्या वेशात असलेल्या तरुणानं तोच हात पकडून त्याचा चितपट केला. या साधूची वस्र घातलेल्या तरुणानं पैलवानांचा केलेला चितपट इतका जबरदस्त होता की कदाचित तेही पुढचे अनेक महिने हा प्रसंग विसरणार नाहीत. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून सोशल मीडियावर तुफान व्हिडीओ व्हायरल होत आहे.
हे वाचा- कोरोना काळात नोकरी जाण्याच्या भीतीनं एकाच कुटुंबातील 3 जणांची आत्महत्या
हे वाचा- ‘गँग ऑफ वासेपूर’ स्टाइल कैद्यांनी ठोकली धूम, जळगाव कारागृहातील घटनेचा VIDEO सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी तुफान कमेंट्स केल्या आहेत. हा व्हिडीओ आतापर्यंत 12 हजार हून अधिक लोकांनी पाहिला असून 200 हून अधिक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. कपड्यांवरून कोणालाही जज करू नये असं एका युझरनं म्हटलं आहे. बाबांना राग आल्यानं त्यांनी धोबीपछाड केल्याचं एका युझरनं म्हटलं आहे. 3 जणांचा 5 सेकंदात चितपट अशीही भन्नाट कमेंट एका युझरनं केली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तीन पैलवानांना अवघ्या 5 सेकंदात गार करणाऱ्या या साधूची मात्र सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे.