JOIN US
मराठी बातम्या / Viral / आलिशान घरं..महागडी वाहनं! एका पिकाने बदललं अख्ख्या गावाचं नशीब; इथला प्रत्येक शेतकरी आहे करोडपती

आलिशान घरं..महागडी वाहनं! एका पिकाने बदललं अख्ख्या गावाचं नशीब; इथला प्रत्येक शेतकरी आहे करोडपती

शिमल्यापासून ९० किलोमीटर दूर असलेल्या मडावग गावातील लोकांची जीवनशैली पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. आलिशान घरे आणि महागडी वाहने पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही, की मडावग येथील रहिवाशांनी शेती करून हे सर्व मिळवलं आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

शिमला 12 जानेवारी : हिमाचल प्रदेशची राजधानी शिमल्यापासून ९० किलोमीटर दूर असलेल्या मडावग गावातील लोकांची जीवनशैली पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. आलिशान घरे आणि महागडी वाहने पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही, की मडावग येथील रहिवाशांनी शेती करून हे सर्व मिळवलं आहे. पण, 230 कुटुंबे असलेल्या या गावाचं नशीब शेतीनेच पलटलं आहे, हे सत्य आहे. या गावात वर्षाला १७५ कोटी रुपयांची सफरचंद विकली जातात. इथे राहणारा प्रत्येक शेतकरी करोडपती आहे. गावातील शेतकरी कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 35 ते 80 लाख रुपयांपर्यंत आहे. यामुळेच आता हे गाव आशियातील सर्वात श्रीमंत गाव आहे. Video : पारंपरिक कुंभार उद्योग होणार हायटेक, इलेक्ट्रिक चाकावर द्या भांड्यांना आकार मडावग येथील शेतकरी पूर्वी बटाटे पिकवत असत. १९५३-५४ मध्ये गावातील चइया राम मेहता यांनी सफरचंदाची बाग लावली. त्यांनी गावातील इतर लोकांनाही सफरचंद शेती करण्यास प्रोत्साहन दिले. हळूहळू सर्वांनी इथे सफरचंदाची लागवड करायला सुरुवात केली. सन 2000 नंतर मडावगच्या सफरचंदाला देशात ओळख मिळू लागली. आता येथील बागायतदार हाय डेन्सिटी प्लांटेशनसारख्या आधुनिक तंत्राने सफरचंदाची लागवड करतात. मडावगच्या सफरचंदाचा दर्जा उत्कृष्ट आहे. त्यामुळे ते लगेचच चढ्या दराने विकले जाते. मडावगच्या सफरचंदाला परदेशातही खूप पसंती मिळते. मडावगच्या आधी शिमला जिल्ह्यातील क्यारी गाव आशियातील सर्वात श्रीमंत गाव होते. क्यारी हेदेखील सफरचंदामुळे आशियातील सर्वात श्रीमंत गाव बनले होते. सोलापुरात 3 दिवस कांद्याचा लिलाव बंद, वाचा काय आहे कारण मडावग आणि क्यारी गावाची प्रगती आजूबाजूच्या इतर गावांना काहीतरी नवीन करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. मडावग गावाजवळ वसलेले दशोली गावही उच्च दर्जाच्या सफरचंदांसाठी प्रसिद्ध होत आहे. दशोली गावात 8000 ते 8500 फूट उंचीवर सफरचंदाच्या बागा आहेत. ही उंची उच्च दर्जाच्या सफरचंद उत्पादनासाठी आदर्श आहे. दशोलीचे सफरचंद दर्जेदार किन्नौर आणि जम्मू काश्मीरच्या सफरचंदांनाही मात देत आहे.

इथले बागायतदार उत्तम दर्जाच्या सफरचंदांचे उत्पादन तर घेत आहेतच, शिवाय एकरी उत्पादनाचा विक्रमही करत आहेत. स्थानिक व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार, दशोलीचा छोटा बागायतदारही सफरचंदांच्या 1000 पेट्या तयार करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या