JOIN US
मराठी बातम्या / Viral / Video : संतप्त पाणघोड्याचा पर्यटकांच्या बोटीवर हल्ला, व्हिडीओ पाहून अंगावर येईल काटा

Video : संतप्त पाणघोड्याचा पर्यटकांच्या बोटीवर हल्ला, व्हिडीओ पाहून अंगावर येईल काटा

सोशल मीडियावर अनेक पशु-पक्षी आणि प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. लोकांना वन्यजीव म्हणजे जंगलाचे जग जाणून घेणे आणि ते जवळून पाहणे आवडते.

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 10 जानेवारी : सोशल मीडियावर अनेक पशु-पक्षी आणि प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. लोकांना वन्यजीव म्हणजे जंगलाचे जग जाणून घेणे आणि ते जवळून पाहणे आवडते. यासाठी पर्यटक कायमच उत्सुक असतात आणि विविध ठिकाणी फिरायला जात असतात. मात्र पर्यटकांना अनेकवेळा वन्यजीवन किंवा कुठलंही पर्यटन स्थळे पाहताना भयानक अनुभव येत असतात. अशातच असाच काहीसा भयानक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये संतप्त पाणघोडा पर्यटकांच्या बोटीवर हल्ला करताना दिसत असून हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. जंगलाचे जग जवळून पाहणे कधी कधी धोक्याचं असतं. असाच एक भयंकर धोका पर्यटकांसमोर नदीत बोटिंग करताना आला. हेही वाचा -  शारीरिक संबंध ठेवताना वृद्धाचा मृत्यू; मोलकरणीमुळे उलगडलं मृत्यूचं गुढ व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, जंगलात फिरायला आलेले पर्यटक मस्त बोटीचा आनंद घेत आहेत. तितक्यात संतापलेला पाणघोडा त्यांच्या बोटीचा पाठलाग करतो. त्याचवेळी बोट चालवणारी व्यक्ती समजूतदारपणा दाखवत बोट वेगाने चालवत तेथून निघून जाते. मात्र हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. आता पुढे काय होईल आणि पर्यटक यातून वाटतील का असा प्रश्न व्हिडीओ पाहिल्यावर मनात येतो.

संबंधित बातम्या

हा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर @30sectips नावाच्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. 14 सेकंदांचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हालाही भीती वाटल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

दरम्यान, जंगलात अनेक प्राणघातक आणि भयानक प्राणी आढळतात. यातील अनेक प्राणी आपली भूक भागवण्यासाठी इतर प्राण्यांची शिकार करताना दिसतात. त्याच वेळी, काही प्राणी त्यांच्या भागात गेल्यावर संतप्त होतात आणि पर्यटकांवर हल्ला करतात. त्यामुळे पर्यटनासाठी गेल्यावर स्वतःची काळजी घेणं जास्त महत्त्वाचं आहे. अनेकवेळा प्राणी जीवहल्ले करतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या