हैदराबाद, 19 सप्टेंबर : शरीरासाठी झोप फार महत्त्वाची असते. मात्र काम करत असताना झोप लागली तर त्याचे परिणाम वाईट होतात. असाच काहीसा प्रकार एका चोरासोबत घडला. म्हणजे चोरी करायला गेलेल्या चोराला त्याच घरात झोप लागली, आणि त्यांची पंचायत झाली. हा सगळा प्रकार आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यात घडला. एक 22 वर्षीय चोर एका घरात चोरी करण्यासाठी गेला, त्यावेळी त्या घरात एसी सुरू असल्यामुळे तिथंच त्याचा डोळा लागला. बाबू असे या 22 वर्षीय चोराचे नाव आहे. गोदावरी जिल्ह्यातीलच एका पेट्रोल पंप मालकाच्या घरी चोरी करण्यासाठी गेला होता. चोरी करण्याआधी बाबूनं घराती रेकी करून एक प्लॅन आखला होता. वाचा- क्या बात है! ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाशी गप्पा मारत डॉक्टरनं केली मेंदूची शस्र क्रिया 12 सप्टेंबर रोजी बाबू पेट्रोल पंप मालकाच्या घरी पहाटे 4 वाजता शिरला. बाबू थेट मालक सत्ती वेंकट रेड्डी यांच्या घरातच शिरला, मात्र त्यांच्यां बेडरूममध्ये एसी सुरू होता. एसीच्या गार हवेमुळे बाबूला झोप लागली, आणि तो तिथेच झोपला. बाबूने पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसीच्या गार हवेमुळे त्याला झोप लागली. त्याला वाटलं थोड्यावेळानं उठून तो चोरी करेल, मात्र तसे झाले नाही. बाबू जेव्हा झोपेतून उठला तेव्हा त्याच्या समोर चोर उभे होते. वाचा- OMG! खड्ड्यात ट्रकला बाहेर काढताना झाली मोठी गडबड, नेमकं काय घडलं पाहा VIDEO बाबूच्या घोरण्याचा आवाज ऐकून वेंकट रेड्डी जागे झाले, आणि त्यांना खोलीत कोंडून ठेवले. रेड्डी यांनी लगेचच पोलिसांना फोन लावला. सातच्या सुमारास पोलीस आले, तोपर्यंत बाबू गाढ झोपला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसीमुळे बाबूला झोप लागली आणि तो पकडला गेला. तसेच, चौकशीमध्ये बाबू प्रोफेशनल चोर नसून, आर्थिक अडचणीमुळे त्याला चोरी करावी लागली असे समोर आले. पोलिसांनी बाबू विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.