JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO : Anand Mahindra यांना पोलीस कॉन्स्टेबलने केला मेसेज; सोशल मीडियावर जोरदार चर्चा

VIDEO : Anand Mahindra यांना पोलीस कॉन्स्टेबलने केला मेसेज; सोशल मीडियावर जोरदार चर्चा

ट्वीटसह आनंद महिंद्रांनी एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

Anand Mahindra Tweet: काही दिवसांपूर्वी उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी (Anand Mahindra Tweet) आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये आनंद महिंद्रा (Anand Mahindras Car) यांना आपल्या कंपनीने तयार केलेल्या बोलेरो गाडीचं कौतुक ऐकायला मिळालं. एका व्हिडीओमध्ये बोलरो कार पाण्यातून जाताना दिसत आहे. हा व्हिडीओ गुजरातमधील राजकोट शहरातील असून ती गाडी एक पोलीस कॉन्स्टेबल चालवित होता. पावसामुळे रस्ता भर पाणी जमा झाल्याचं दिसत आहे. यादरम्यान पोलीस पाण्यातून गाडी (driving the Bolero in Rain) काढत आहे. कोणी युजरने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या युजरने व्हिडीओ शेअर करीत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, महिंद्रा आहे तर शक्य आहे…कोणत्याही कॅप्शनची गरज नाही. आनंद महिंद्रा यांनी (Anand Mahindra Shared Video) हा व्हिडीओ शेअर करीत ट्विटमध्ये लिहिलं आहे की, खरंच? पावसाच्या दिवसातही ? मी अगदी हैराण झालोय. ’ हे ही वाचा- Drivingवेळी ट्रॅफिक नियम मोडला?कसं समजेल तुमचं challan कापलं की नाही;इथे चेक करा

संबंधित बातम्या

कॉन्स्टेबलने गाडीचं केलं कौतुक हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर (Viral Video) बोलेरो गाडी चालक पोलीस कॉन्स्टेबल यांनी आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांना मॅसेल केला. स्वत: आनंद महिंद्रा यांनी याची माहिती दिली. त्यांनी हा व्हिडीओ पुन्हा शेअर केला आहे. यावेळी त्यांनी लिहिलं की, मला राजकोट पोलीस विभागातील कॉन्स्टेबल जोशींचा मेसेज आला. त्या दिवशी भरपाण्यात तेच बोलेरो गाडी चालवित होते. त्यांनी बोलेरोचं कौतुक केलं आहे. बोलेरो चालविण्यासाठी पॉवरफूल ड्रायव्हरची गरज असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. आनंद महिंद्रांचं हे ट्विट खूप व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर लोक त्यांच्या या ट्विटवर आवर्जुन प्रतिक्रिया देत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या