JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO: Digital India कडे अशीही वाटचाल! नंदीबैलाच्या डोक्यावर UPI Scan कोड, आनंद महिंद्राही थक्क

VIDEO: Digital India कडे अशीही वाटचाल! नंदीबैलाच्या डोक्यावर UPI Scan कोड, आनंद महिंद्राही थक्क

आनंद महिंद्रांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दान देण्यासाठी नंदी बैलाच्या कपाळावरचा UPI कोड आपल्या स्मार्टफोनने स्कॅन करताना दिसत आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 07 नोव्हेंबर: अनेकदा सोशल मीडियावर (Social Media Viral Video) असे काही व्हिडीओ पाहतो ज्यामुळे आपण दंग होऊन जातो. देशातील दिग्गज व्यावसायिक आनंद महिंद्रा बऱ्याचदा असे व्हिडीओ सोशल मीडियावर (Anand Mahindra on Social Media) पोस्ट करत असतात. ते ट्विटरवर विशेष सक्रीय आहे. अलीकडेच त्यांनी शेअर केलेला व्हिडीओ असाच आश्चर्यचकित करणारा (Shocking Video on Internet) आहे. सध्या सर्व जग डिजिटल बनत आहे. भारतातीही डिजिटायझेशनकडे (Digital India in Making) वाटचाल सुरू आहे. पेमेंट करण्यासाठी तर आजकाल बहुतांश ठिकाणी डिजिटल पद्धतींचाच वापर केला जातो. डिजिटल पेमेंटच्या पद्धती लॉकडाऊन काळात विशेष वापरण्यात आल्या. यासंदर्भातच आनंद महिंद्रांनी शेअर केलेला व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी 30 सेकंदाचा हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी असं कॅप्शन दिलं आहे की, ‘भारताची डिजिटल पेमेंट पद्धतीकडे वेगाने वाटचाल सुरू आहे यासाठी तुम्हाला आणखी कोणत्या पुराव्याची आवश्यकता आहे का?’

या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दान देण्यासाठी नंदी बैलाच्या कपाळावरचा UPI कोड आपल्या स्मार्टफोनने स्कॅन करताना दिसत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो जणांनी पाहिला आहे शिवाय रिट्विट्सही खूप आहे. दारावर अनेकदा नंदीबैलवाला येतो, पण बऱ्याचदा त्यांना पैसे नाहीत म्हणून पुढे पाठवलं जातं. मात्र आता ते देखील UPI स्कॅनने पैसे घेत असल्याने तुम्हाला आता पैसे देण्यावाचून पर्याय राहणार नाही. आहे की नाही भन्नाट? हे वाचा- कोट्यवधींची उलाढाल! 10 लाखाला ‘शाहरूख’ची विक्री, ‘सलमान’ची बोली लागली 7 लाखाला आनंद महिंद्रांनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेक कमेंट्स येत आहेत. काहींनी या व्हिडीओवर मोदींचं कौतुक केलं आहे. ‘मोदी जी है तो मुमकिन है..’, ‘यापेक्षा जास्त डिजिटाझेशन होऊ शकत नाही’, अशाप्रकारच्या कमेंट्स यावर आल्या आहेत. या स्तरापर्यंत डिजिटाझेशन पोहोचल्याने एका युजरने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार देखील मानले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या