वॉशिंग्टन, 15 जुलै : तुम्ही कधी चेहऱ्यावर एखादा ग्लास किंवा बिअर कॅन चिकटवून पाहिलं आहे का? तुम्ही असं करू शकलात तर तुम्हालाही वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी आहे. एका व्यक्तीने नुकताच असा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. त्याने एक-दोन नव्हे तर तब्बल 10 बिअर कॅन आपला चेहरा आणि डोक्यावर चिकटवले. त्याची गिनीज बुकमध्ये नोंद झाली आहे (Man stick beer cans on head world record). अमेरिकेतील जेमी कीटन असं या व्यक्तीचं नाव आहे, ज्याने एकाच वेळी चेहरा, डोक्यावर एकत्र 10 बिअर कॅन चिकटवत रेकॉर्ड केला आहे. 1 जून 2022 रोजी त्याने रेकॉर्ड बनवला. जेमीने याआधीही 11 जानेवारी 2016 रोजीही हा रेकॉर्ड आपल्या नावाने केलं आहे. त्यावेळी त्याने 8 कॅन आपल्या डोक्यावर चिकटवून रेकॉर्ड केला होता. त्यानंतर 1 सप्टेंबर 2019 रोजी जपानच्या शिनिची कानोने 9 कॅन चिकटवून हा रेकॉर्ड तोडला. आता जेमीने आता पुन्हा हा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. हे वाचा - Optical Illusion: ‘या’ कार्टूनमध्ये दडलाय कुत्रा, 30 सेकंदामध्ये शोधला तर तुम्ही ठराल स्मार्ट रिपोर्टनुसार जेमीने कॅन्स जवळपास 5 सेकंद चेहऱ्यावर धरून ठेवले. आता हे कसं शक्य झालं असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. जेमीला हे केलं ते एअर प्रेशरच्या सहाय्याने. त्याने त्वचेवर सक्शन इफेक्ट बनवले, ज्याच्या मदतीने ते चिकटून राहिले.
सामान्यपणे एक कॅनही एअर सक्शनच्या मदतीने चिकटवणं अशक्य आहे. पण जेमीने हे करतब करून दाखवलं. जेमीने सांगितलं, त्याला एक विचित्र स्किन कंडिशन आहे. ज्याची अद्यप माहिती मिळालेली नाही. यामध्ये त्याच्या त्वचेवरील पोर ऑक्सिजन शोषून घेतं. ज्यामुळे कॅन आणि त्वचेदरम्यान हवा राहत नाही. हे वाचा - Viral Video : बनावट हाताला केलेला स्पर्शही जाणवू लागला; जादू आहे की, विज्ञानाचा खेळ? जेव्हा तो लहान होता तेव्हा त्याच्या हातावरही खेळणं चिकटून राहतं. शाळेत आपल्या मित्र-मैत्रिणींचं मनोरंजन करण्यासाठी तो हे करून दाखवायचा, असंही तो म्हणाला.