मुंबई, 22 जुलै : रेल्वे दुर्घटनेचा एक भयंकर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नदीवरील पुलावरून जात असताना एका ट्रेनने पेट घेतला. ट्रेन आगीच्या विळख्यात सापडली. त्यानंतर रेल्वेतील प्रवाशांनी आपला जीव वाचवण्यासाठी खिडकीतून धडाधड व्हिडीओ मारल्या. बर्निंग ट्रेनचा हा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. धडकी भरवणारा असा हा व्हिडीओ आहे. अमेरिकेच्या बोस्टनमधील ही दुर्घटना आहे. गुरुवारी सकाळी चालत्या ट्रेनला आग लागली. ट्रेन मिस्टिक नदीवरील पुलावर आली तितक्यात ट्रेनने पेट घेतला. दुर्घटना घडली तेव्हा ट्रेनमध्ये जवळपास 200 प्रवासी होते. ट्रेन आगीच्या विळख्यात सापडताच खळबळ उडाली. प्रवासी घाबरले आणि जो तो आपला जीव वाचवण्यासाठी पळापळा करू लागला. शेवटी सर्वांनी खिडक्यांमधून उड्या मारल्या. हे वाचा - VIDEO - एकदा वाचली तरी पुन्हा रिस्क घेतली; भरधाव ट्रेनसमोर दुसऱ्यांदा ट्रॅक क्रॉस करायला गेली महिला आणि…; धक्कादायक शेवट व्हिडीओत पाहू शकता ट्रेनच्या इंजिनजवळ आग लागली आहे आणि ट्रेन पेट घेते आहे. हळूहळू आग पुढील डब्यापर्यंत जाते आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 200 प्रवाशांना रेल्वेतून सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं आहे. काही लोक खिडकीतून पळाले. एका महिला प्रवासाने मिस्टिक नदीत उडी मारली. या घटनेत जीवितहानी झाल्याची माहिती नाही. हे वाचा - Amublance Accident Video : टोलनाक्यावर भरधाव रुग्णवाहिकेच्या चिंधड्या उडाल्या; भयंकर अपघातातात रुग्णासह 3 ठार एका प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, आग लागल्यानंतर स्फोटही झाला होता. ज्यामुळे प्रवासी घाबरले. ट्रेनमध्ये आग लाग्लयाचं समजताच सर्वजण खिडक्यांमधून उड्या मारू लागले. काही क्षणात ट्रेनच्या बोगींमध्ये आगीचा धूर पसरू लागला होता.
मॅसाच्युसेट्स बे ट्रान्सपोर्टेशन अथॉरिटीने दिलेल्या माहितीनुसार एक मेटल सीट इलेक्ट्रिसिटीच्या संपर्कात आल्याने ही आग लागली होती. त्यानंतर वीज तात्काळ बंद करण्यात आली.