प्रतिकात्मक फोटो
मुंबई 05 सप्टेंबर : आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ती एकदा तरी रेस्टॉरंटमध्ये गेलाच असेल. येथे आपण कधी आपल्या मित्रांसोबत जातो, तर कधी कुटुंबासोबत. येथे आपण ज्या गोष्टी ऑर्डर करतो. त्या गोष्टींचे आपल्याला पैसे द्यावे लागतात. तसेच बरेच असे रेस्टॉरेंट आहेत. जेथे आपल्याला पिण्याच्या पाण्यासाठी देखील पैसे द्यावे लागतात. तसे पाहाता इथपर्यंत सगळं ठिक आहे. पण एका रेस्टॉरेंटने तर संपूर्ण हद्द पार केली आहे. ते म्हणतात ना की आयुष्यात काहीही फुकट मिळत नाही, ती म्हण या रेस्टोरंटने जास्तच मनावर घेतली आहे. हा प्रकार ‘ला एस्क्विना कॉफी शॉप’मध्ये पाहायला मिळाला, जेव्हा एका ग्राहकाने येथील वॉशरूमचा वापर केला, तेव्हा तिच्यासोबत जे घडलं, ते पाहून तिच्या चेहऱ्याचा रंगच उडाला आहे. या ग्राहकाकडून कॉफी शॉपने वॉशरूम वापरल्यावर बिल हातात ठेवले. वॉशरूमचं बिल पाहून ग्राहकाला धक्काच बसला. तसेच या बिलात त्यांनी बाथरूम वापरण्यासाठी नेमके पैसे का घेतले ते देखील लिहिलं होतं. नेल्सी कॉर्डोव्हा नावाच्या ग्राहकाला रेस्टॉरंटमधून बिल मिळताच ती थक्क झाली, ज्यामध्ये बाथरूम वापरण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारण्यात आल्याचे दिसून आले. नेल्सीने ट्विटरवर या पावतीचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ‘ऑक्यूपेशनल स्पेस’साठी ही फी आकारल्यचे दर्शविले आहे. हे वाचा : त्यांच्या आयुष्यात पैसा स्वप्नासारखा आला, पण होतं नव्हतं ते सगळं घेऊन गेला; नक्की असं काय घडलं? नेल्सीने पोस्ट शेअर करताच लोकांनी रेस्टॉरंटवर टीका केली आहे आणि ते निंदनीय असल्याचे म्हटले आहे. ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका यूजरने लिहिले की, ‘‘मला आश्चर्य वाटते की त्यांनी रेस्टॉरंटमधील हवेसाठी शुल्क आकारले नाही.’’ या रेस्टॉरंटमध्ये गेलेल्या एका यूजरने सांगितले की, ‘‘मी या रेस्टॉरंटमध्ये गेलो आहे. मला ते खूप रिकामी दिसले, मला आता समजले की ती जागा का रिकामी होती. ’’ हे वाचा : तुर्कीश आईस्क्रीम विक्रेता आईस्क्रीम देत नाही, म्हणून लहान मुलानं लढवली शक्कल… पाहा व्हिडीओ आपल्या रेस्टॉरेंटबद्दल असं बोललं जात असल्यामुळे रेस्टोरंटने देखील यावर आपले स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले ‘आम्ही या घटनेबद्दल दिलगीर आहोत, ही एक अतिशय गंभीर आणि अनैच्छिक त्रुटी होती, जी आमच्या सिस्टममध्ये आधीच दुरुस्त करण्यात आली आहे.आम्ही आधीच प्रभावित व्यक्तीशी संपर्क साधून परतावा मिळवण्यासाठी आणि नुकसानीची भरपाई करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत."