JOIN US
मराठी बातम्या / Viral / 'देवाचे अन्न' म्हणून इथे खाल्ली जाते किड्यांची अंडी, एका छोट्या बरणीची किंमत खूपच जास्त

'देवाचे अन्न' म्हणून इथे खाल्ली जाते किड्यांची अंडी, एका छोट्या बरणीची किंमत खूपच जास्त

या तलावात एक विशिष्ट प्रकारचा किडा आढळून आला आहे, जो प्रत्यक्षात मेक्सिकोमध्ये पाण्यातील माशीची अंडी आहे.

जाहिरात

व्हायरल न्यूज

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 15 ऑक्टोबर : पृथ्वीवर वेगवेगळे देश आहेत, प्रत्येकाचे नियम, चालिरीती सगळंच वेगळं असतं. ज्याबद्दल आपल्याला देखील माहिती नसते. एवढंच काय तर अगदी लोकांचे कपडे, भाषा, रंग आणि जेवणात देखील आपल्याला तफावत जाणवते. जो पदार्थ किंवा वस्तू एखाद्या ठिकाणी खाणं किंवा वापरनं विचित्र वाटते. तिच गोष्ट दुसऱ्या भागात लोक आवडीने खातात. असाच एक पदार्थ मेक्सिकोमध्ये प्रसिद्ध आहे. येथे लोक ‘देवाचे अन्न’ म्हणून जो पदार्थ आवडीने खातात. तो पदार्थ प्रत्यक्षात काय आहे हे समजल्यावर तुम्हाला किळस येईल. ऑक्सीडेंटल वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, मेक्सिको सिटीपासून काही अंतरावर टेक्सकोको तलाव नावाचा एक तलाव आहे, ज्यामध्ये अनेक प्रकारचे जलजीव राहतात. हे ही वाचा : स्वत:च काढलेली 90 कोटींची पेंटिग कलाकाराने जाळली, कारण ऐकून हैराण व्हाल या तलावात एक विशिष्ट प्रकारचा किडा आढळून आला आहे, जो प्रत्यक्षात मेक्सिकोमध्ये पाण्यातील माशीची अंडी आहे, परंतु लोक त्याला डास मानतात. आता आश्‍चर्य या लोकांच्या चुकीचा समजचा नाही तर, इथे लोक या माशीची अंडी मोठ्या आवडीने खातात. शेतकरी अंडी काढतात पाण्यातील माशीच्या अंड्याला आहुआट्ले माशीची अंडी म्हणतात. ते मटारच्या दाण्यापेक्षा लहान आहेत आणि त्यांना येथे ‘देवांचे अन्न’ म्हटले जाते. अहुआटले म्हणजे आनंदाचे बीज. मेक्सिकोमध्ये, ते अझ्टेक साम्राज्याच्या काळापासून, म्हणजेच 14-15 व्या शतकापासून वापरले जात आहे. अंडी घालण्यासाठी, शेतकरी पाण्याच्या पृष्ठभागाच्या अगदी खाली एक मोठे जाळे बांधतात आणि ते सुमारे 3 आठवडे सोडतात. त्यावर माशी अंडी घालते, जी गोळा करून उन्हात वाळवली जाते. त्यानंतर तयात मैदा, तेल मिसळून त्याला खाण्यासाठी तयार केले जाते. हे ही वाचा : जळलेल्या केसांपासून बनवलेला परफ्यूम, किंमत पाहून व्हाल शॉक! 4 तासात 10 हजार बॉटलची विक्री किंमत किती आहे? आजच्या काळात, मेक्सिको सिटीमधील अनेक रेस्टॉरंट्सने ही डिश बनवणे बंद केले आहे कारण ही डिश तरुणांमध्ये लोकप्रिय नाही. यामागचं अजून एक कारण असू शकतं की ही अंडी ज्या तलावातून जमा केली जातात ते तलाव कोरडे पडत आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की अहुआटले अंडी खूप महाग आहेत. बीबीसीच्या 2019 च्या अहवालानुसार, या अंड्यांच्या अगदी लहान जारची किंमत $ 20 म्हणजेच 1600 रुपये आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या