JOIN US
मराठी बातम्या / Viral / महिलेचे एक लाख रुपये घेऊन पळाला माकड आणि... पुढे जे घडलं ते ऐकून बसेल धक्का

महिलेचे एक लाख रुपये घेऊन पळाला माकड आणि... पुढे जे घडलं ते ऐकून बसेल धक्का

का महिलेची बॅग घेऊन एक माकड पळून गेला. या बॅगेत एक लाख रुपये रोख आणि काही कागदपत्रेही होती.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 26 डिसेंबर : माकड हे नेहमीच धुडगुस घालत असतात. त्यांच्या हातात एखादी वस्तू लागली की ते मग द्यायचं नाव घेत नाहीत. तुम्हाला माकड आणि टोपीवाल्याची गोष्ट तर माहित असेल. शिवाय तुम्ही यासंबंधीतचे अनेक व्हिडीओ देखील पाहिले असतील. ज्यामध्ये माकड कधी लोकांचं खाणं घेऊन पळतो तर कधी एखादी वस्तू. पण माकडासंबंधीत एक अशी बातमी समोर आली आहे. जी ऐकून तुमच्या पाया खालची जमीनच सरकेल. हो, कारण या माकडाने एका महिलेचे चक्क एक लाख रुपये पळवले आहेत. ही बातमी थायलंडमधून समोर आली आहे. तिथे एका महिलेची बॅग घेऊन एक माकड पळून गेला. या बॅगेत एक लाख रुपये रोख आणि काही कागदपत्रेही होती. हे ही पाहा : चिमुकल्यांनी वाचवले आईचे प्राण, Video सोशल मीडियावर जोरदार व्हायरल वास्तविक, ही घटना थायलंडमधील एका प्रांतातील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पार्कमध्ये फिरायला गेलेल्या एका महिलेपर्यंत माकडांचा एक गट पोहोचला. ही बाब त्या महिलेला कळू शकली नाही आणि त्यानंतर त्यातील एका माकडाने महिलेकडे जाऊन तिची बॅग हिसकावून पळ काढला. बाईंनी मागे वळून पाहिलं तर माकड खूप दूर गेलं होतं. महिलेने माकडाचा पाठलाग केला पण तो पळून गेला. यानंतर माकडाने या महिलेची बॅग घेतली आणि खोल दरीत फेकून दिली. महिलेने त्याच्यावर आरडाओरडा सुरू केला, तिचा आवाज ऐकून उद्यानातील कर्मचारी तेथे पोहोचले आणि महिलेने संपूर्ण हकीकत सांगितली. यानंतर उद्यानातील अनेक कर्मचाऱ्यांनी मिळून ती पिशवी त्या दरीतून बाहेर काढण्यासाठी मोहीम राबवली. हे ही पाहा : ओला स्कुटरचा वापर असा ही? Video पाहून पोट धरुन हसाल अखेर काही वेळाने दोरी आणि इतर गोष्टींच्या साहाय्याने या महिलेच्या बॅगेला बाहेर काढण्यात आले. या सगळ्याच चांगली गोष्ट अशी झाली ती म्हणजे माकडाला त्या बॅगेची चैन उघडता आली नाही. ज्यामुळे त्या बॅगेत महिलेचे एक लाख रुपये आणि अनेक कागदपत्रे सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या महिलेने याचा व्हिडीओही सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सोशल मीडियावर लोक महिलेला दोष देत असले तरी काहीजण यात कोणाचाही दोष नसल्याचेही सांगत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या