JOIN US
मराठी बातम्या / Viral / भिंतीवर लघवी करुन दाखवाच, 'या' शहरातील सरकानं लढवली अजब शक्कल

भिंतीवर लघवी करुन दाखवाच, 'या' शहरातील सरकानं लढवली अजब शक्कल

हा प्रयोग पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत आणि हे कसे होऊ शकते हे जाणून घेण्यासाठी लोकांमध्ये उत्सूक्ता आहे.

जाहिरात

इथे लघवी कराल, कर कामातून जाल

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 22 जानेवारी : भारतात तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल की काही पुरुष मंडळी खाली भिंत दिसली की ते तेथे लघवी करायला जातात. काही शिक्षित आणि अती शहाणे लोक देखील याला अपवाद नाहीत. अनेक मोठ्या शहरांमध्येही लोक भिंतींवर लघवी करून नये असा बोर्ड लावतात. पण त्याचा देखील काहीही फायदा होत नाही. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण भारतातच नाही तर लंडन सारख्या शहरात देखील असा प्रकार घडतो. येथे देखील अनेक लोक उघड्यावर लघवी करतात. त्यामुळे अशा लोकांना आळा घालण्यासाठी येथील सरकारने एक भलतीच कल्पना लढवली आहे. हे ही पाहा : डोंगराळ भागात अचानक हवेत उडू लागली बस, Video पाहून तुम्हीही चक्रावाल येथे एक अशी भिंत तयार करण्यात आली आहे. जिथे लघवी करण्यास पूर्णपणे मानई आहे आणि तरी देखील तुम्ही लघवी केलात, तर तुमच्या नशिबाने तुम्हीच…. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं का? खरंतर लंडनमधील एक भिंत चर्चेत आहे, या भिंतीला अशा पद्धतीने बनवलं गेलं आहे की जर यावर कोणी लघवी केली तर ती पुन्हा त्या व्यक्तीवरच पडेल. ज्यामुळे या व्यक्तीचे कपडे त्याच्या लघवीनेच घाण होतील. हा प्रयोग पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत आणि हे कसे होऊ शकते हे जाणून घेण्यासाठी लोकांमध्ये उत्सूक्ता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लंडनमध्ये स्थित सोहो नावाची अशी जागा आहे जिथे लोकांना घरातून बाहेर पडताच लघवीच्या वासाचा सामना करावा लागतो. आता लोकांच्या सर्व तक्रारींनंतर स्थानिक प्रशासनाने याविरोधात कठोर भूमिका घेत नवी युक्ती शोधून काढली आहे. रिपोर्ट्सनुसार, सोहोच्या भिंतींवर एक खास अँटी-पी पेंट लावला जात आहे. या पेंटवर पाणी किंवा लघवी थांबत नाही आणि उलट त्याचे शिंतोडे बाहेरच्या दिशेला उडते. म्हणजे हा पेंट केलेल्या भिंतीवर कोणीतरी लघवी करण्याचा प्रयत्न करताच, लघवीची धार भिंतीवर आदळते आणि त्या व्यक्तीवर पुन्हा उडते. लंडनच्या सोहोमध्ये सुमारे डझनभर ठिकाणी हा खास पेंट लावला जात आहे. हा पेंट कसं काम करतं पाहा

हा पेंट कसं काम करतं पाहा

प्रत्यक्षात या पेंटबाबत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. दुसर्‍या अहवालानुसार, हा एक सुपरहायड्रोफोबिक द्रव आहे जो पारदर्शक आहे. त्यावर पाण्याचा थेंबही टिकू शकणार नाही, अशा पद्धतीने हा द्रव तयार करण्यात आला आहे.

पेंटसह लंडनमधील भिंतींवर क्यूआर कोड लागू केला जाईल, असेही सांगण्यात आले. जेणेकरून आजूबाजूला सार्वजनिक शौचालये कुठे आहेत हे कळू शकेल. त्यामुळे रस्त्यावर अशी घाण होणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या