प्रतिकात्मक फोटो
मुंबई 1 डिसेंबर : अनेक कपल लग्नापूर्वी रिलेशनशिपमध्ये असतात. त्यानंतर बऱ्याचदा त्याच जोडीदाराशी ते लग्न करतात. पण काही रिलेशन पुढे जात नाहीत आणि ते दुसऱ्या व्यक्तीसोबत बंधनात अडकतात. काही लोकांना लग्नानंतर किंवा लग्नापूर्वी आपल्या जोडीदाराबद्दल अशा काही गोष्टी माहित पडतात ज्या धक्कादायक असतात. सध्या एक असंच प्रकरण सोशल मीडिया वरुन समोर आलं आहे, ज्याबद्दल ऐकून तुम्हाला धक्का बसेल. एका तरुणीने आपलं संपूर्ण कहाणी रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केली आहे. या कथेबद्दल जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. हे ही पाहा : आई-मुलीचे एकाच मुलाशी संबंध? आधी प्रेम, मग घरी बोलावले आणि मृत्यू… नक्की असं काय घडलं? खरंतर या मुलीचा जो बॉयफ्रेंड आहे, तोच तिचा खरा भाऊ आहे. हो ही मुलगी इतक्या वर्षांपासून ज्या मुलासोबत राहात होती, तो तिचा भाऊ होता. त्यांना जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. आता तुम्ही म्हणाल की इतके दिवस त्यांना हे माहित नव्हतं का? तर नाही. या तरुणीने सांगितले की, तिचं 32 वर्षीय पुरुषासोबत संबंधात होती. लहानपणी तिला दत्तक घेतले गेले होते आणि हायस्कूलनंतर तिला याबद्दल कळले. तसेच या मुलीच्या प्रियकरालाही दत्तक घेण्यात आले होते. ज्यामुळे त्यांना ते बहिण भाऊ असल्याचे कळले नाही. खरंतर या दोघांनाही आपल्या खऱ्या आई-वडिलांबद्दल जाणून घ्यायचं होतं. त्यामुळे त्यांनी डीएनए टेस्ट केली, पण त्यावेळी त्याच्यासमोर जे सत्य आलं, ते फारच धक्कादायक आहे. यामुलीला हे कळल्यावर तिने ही गोष्ट तिच्या बॉयफ्रेंडपासून लपवून ठेवली आहे, आता काय करावे हे तिला सुचत नाहीय.
हे कपल 6 वर्षांपासून एकत्र आहे. त्यांच्या या डीएनए चाचणीचे अहवाल चुकीचे ठरतील, अशी आशा मुलीला अजूनही वाटते. दोघांचीही पुन्हा एकदा चाचणी होणार आहे. मात्र कमेंट सेक्शनमधील अनेकांनी आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.