प्रतिकात्मक फोटो
बंगळूरु 21 सप्टेंबर : सोशल मीडियावर आपल्याला अशा काही कहाण्या ऐकायला मिळतात, ज्यांच्यावर विश्वास ठेवणं कधीकधी कठीण जाते. कारण त्या कहाण्या बऱ्याचदा आपल्या कल्पनेच्या पलिकडे असतात. आता देखील अशीच एक कहाणी समोर आली आहे, ही कहाणी एका जोडप्याची आहे, ज्यांचं प्रेम प्रकरण एका ट्राफीकमधून सुरू झालं, जे लग्नापर्यंत पोहोचलं. खरंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Reddit वर या प्रेमकथेबद्दल एक पोस्ट करण्यात आली होती. ही प्रेमकथा ऐकल्यावर तुम्हाला ती एखाद्या सिनेमातील वाटेल. परंतू ती खऱ्या आयुष्यातील आहे. लोक ट्रॅफिक कंटाळतात, ज्यामुळे ते यामध्ये अडकण्यापासून लांब राहातात. त्यात मुंबई आणि बंगळूरुचं ट्रॅफिक जगभर प्रसिद्ध आहे. यावर अनेकदा लोक मीम्स आणि कॉमेडी देखील करतात. परंतू या ट्रॅफिकमुळे कोणाचं आयुष्य बदलू शकतं, याचा कोणी विचार देखील केला नसावा. हे वाचा : ती तरुणासमोर प्रेमानं येऊन उभी राहिली, पण त्यानंतर तिनं जे केलं; ते धक्कादायक, पाहा VIDEO Reddit वर शेअर केलेली ही कथा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर देखील सांगितली गेली. खरंतर बंगळुरूच्या सोनी वर्ल्ड सिग्नलने दोन लोकांचे आयुष्य बदलले. खरंतर हे तरुण-तरुणी आधीपासून एकमेकांना ओळखत होते आणि एकमेकांचे मित्र होते. पण त्यांनी प्रेमाच्या भावनेचा कधी विचारच केला नाही. एके दिवशी हा तरुण आणि तरुणी एकत्र घरी जात होते, तेव्हा बांधकाम सुरू असलेल्या इजीपुरा उड्डाणपुलामुळे दोघेही वाहतूक कोंडीत अडकले.
जाममध्ये अनेक तास अडकल्यामुळे दोघांनाही भूक लागली आणि त्या दिवशी दोघांनी एकत्र जेवण केले. येथूनच या जोडप्याची प्रेमकहाणी सुरू झाली आणि दोघांनी एकमेकांना ३ वर्षे डेट केल्यानंतर लग्नं देखील केलं. हे वाचा : महिलेची छेड काढणं या व्यक्तीला पडलं महागात; अखेर 20 सेकंदात खाव्या लागल्या 40 चपलांचा मार, पाहा Video आता या जोडप्याच्या लग्नाला 2 वर्षे झाली आहेत, म्हणजे यांची प्रेम कहाणी सुरु होऊन 5 वर्ष पूर्ण झाली, पण इजीपुरा उड्डाणपुलाचे बांधकाम अजूनही सुरू आहे. या कपलची लव्हस्टोरी लोकांना खूप आवडली आहे. बंगळूरु ट्रॅफिकचा कोणाला फायदा देखील होऊ शकतो यावर लोकांना विश्वास बसत नाहीय. ज्यामुळे या पोस्टवर लोकांकडून भरभरुन कमेंट्स येत आहेत.