प्रतिकात्मक फोटो
मुंबई 13 डिसेंबर : तरुण मुलं-मुली एकमेकांच्या प्रेमात असतात तेव्हा एकमेकांसाठी काहीही करायला तयार असतात. जसजसं नातं बहरत जातं तसतशी एकमेकांप्रति आपुलकी वाढत जाते. हे नातं अधिक घट्ट करण्यासाठी मोठमोठ्या व महागड्या भेटवस्तू एकमेकांना दिल्या जातात; पण ब्रेक-अप झाल्यावर एका तरुणाने जे काही केलं, त्याबद्दल सध्या बरीच चर्चा सुरू आहे. त्याबद्दल जाणून घेऊ या. प्रेमात असताना प्रेयसीवर प्रियकराने जो काही खर्च केला होता, तो खर्च पद्धतशीरपणे एका एक्सेल शीटमध्ये नमूद करून प्रियकराने प्रेयसीकडे पाठवून तो परत मागितला आहे. ऐकताना ही घटना फार मजेशीर वाटत आहे; पण पूर्वीच्या प्रियकराने केलेली ही कृती तरुणीच्या मनाला लागली.
हे ही पाहा : फोनवर बोलताना असा आवाज आला तर समजून जा तुमचा फोन रेकॉर्ड होतोयतिने सोशल मीडियावर त्याबद्दलची पोस्ट लिहिली आहे. त्या लॉगशीटमध्ये तरुणाने केळी आणि एका टोस्टचं बिलदेखील जोडलं आहे. ही घटना चांगली की वाईट, हा चर्चेचा विषय आहे; मात्र त्या तरुणाची स्मरणशक्ती आणि सर्जनशीलतेला मानावंच लागेल. मॅडी नावाच्या मुलीने आपल्याबाबत घडलेला हा विचित्र अनुभव टिकटॉकवर शेअर केला आहे. त्या व्हिडिओत मॅडी म्हणते, की तिच्या पूर्वीच्या प्रियकराने तिच्यावर महिनाभरात केलेल्या सर्व खर्चांची यादी पाठवली आहे.
त्यात 247 रुपयांच्या केळ्यांपासून एका टोस्टपर्यंतचा सर्व खर्च नमूद केलेला आहे. या यादीसोबत त्याने एक दु:खी गाणंही पाठवलं आहे. त्या यादीतले काही घटक ठळकपणे अधोरेखित केलेले आहेत. शेवटी सर्व खर्चांची बेरीज करून एकूण खर्च सांगितला आहे. वेगवेगळ्या प्रतिक्रिया मॅडीच्या या पोस्टला सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. एका युझरने लिहिलं आहे, की “काम करणाऱ्या दोन व्यक्ती एकत्र राहत असतील, तर त्यांनी होणारा खर्च दोघांमध्ये विभागायला हवा; पण केळी व टोस्टचा खर्च बिलात जोडणं विचित्र आहे.” दुसऱ्या एकाने लिहिलं आहे, की, “हे असं आहे, जसं आपण एखाद्या हॉटेलमध्ये आहात.” यानंतर मॅडीने याच्याशी निगडित आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याला 24 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
कोण काय करेल, काही सांगता येत नाही. ही पोस्ट पाहून मुलं-मुली प्रेमात पडल्यावर काटकसरीने वागली तर त्याचं नवल वाटायला नको