पाटणा, 28 जून : प्रेम आंधळं असतं, असं म्हणतात. प्रेमात पडलेल्या व्यक्तीला वय, जात, नाती, समाज यातल्या कशाचंही बंधन रोखू शकत नाही, असंही म्हटलं जातं. याची प्रचिती नुकतीच आली जेव्हा आजोळी राहणाऱ्या एका तरुणाचं (A youngster) आणि त्याच्या मामीचं (Maternal Uncle’s wife) एकमेकांवर प्रेम जडलं. हे प्रेम इतकं गहिरं होतं की दोघांनी त्यांचं नातं, वय आणि समाज (आणि मामा) यापैकी कशाचीही तमा न बाळगता विवाहबंधनात अडकण्याचा (Married to each other) निर्णय घेतला. बरं, फक्त लग्न करून ते थांबले नाहीत, तर लग्नाचा व्हिडिओ (Video) त्यांनी सोशल मीडियावर (Social Media) टाकला आणि सर्वांनाच धक्का दिला. बिहारच्या (Bihar) जमुई (Jamui) गावात या दोघांनी एकमेकांच्या गळ्यात माळा घालून आणि अग्निभोवती सात फेरे घेऊन अगदी साग्रसंगीत लग्न केलं. याच्या व्हिडिओत भाचा मामीच्या भांगेत कुंकू भरताना आणि मामी आपल्या नव्या पतीला वाकून नमस्कार करताना दिसते. हा व्हिडिओ जमुईमध्ये जोरदार व्हायरल झाला आणि गावात घरोघरी हीच चर्चा रंगली. असं जुळलं मामी-भाच्याचं सूत 22 वर्षांचा चंदन कुमार हा मुंबईत रिक्षा चालवतो. त्याचे मामा-मामीदेखील कामानिमित्त मुंबईतच असायचे. यावेळी चंदन कुमार हा मामाच्याच घरी राहत असे. त्याच काळात त्याचं आणि मामीचं एकमेकांवर प्रेम जडलं. त्यानंतर लॉकडाऊन सुरु झाल्यामुळं तिघंही बिहारमधील आपल्या गावी परतले. तिथंदेखील चंदन हा मामांच्या घरीच राहत होता. मोठी घोषणा! ‘या’ राज्यातील प्रत्येक दलित कुटुंबाला मिळणार 10 लाख रुपये एकदा मामांनी या दोघांना विचित्र अवस्थेत पाहिलं आणि त्यांना धक्का बसला. मात्र त्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जाऊन गावात बोभाटा नको, म्हणून मामांनी सबुरीची भूमिका घेतली. मात्र हे दोघं लग्न करून त्याचा व्हिडिओ गावभर शेअर होईल, याची मामांनी कधी कल्पनाही केली नसेल. लग्नानंतर गाठली मुंबई लग्न झाल्यावर आधीचे मामी-भाचे आणि नव्याने पती-पत्नी झालेले दोघे थेट मुंबईला निघून गेल्याची चर्चा आहे. आपण कुठे जात आहोत, ही माहिती गुप्त ठेऊन आणि केवळ लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून हे दोघं निघून गेले. शिवाय त्यांनी टाकलेल्या व्हिडिओमुळे या अनोख्या लग्नाची चर्चा केवळ एका गावापुरती न राहता ती अख्ख्या देशभर पसरली.