JOIN US
मराठी बातम्या / Viral / पोळ्या करणारी गावातील तरुणी ठरली सोशल मीडिया Sensation; 24 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला VIDEO

पोळ्या करणारी गावातील तरुणी ठरली सोशल मीडिया Sensation; 24 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला VIDEO

ग्रामीण भागातील या मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी यावर अनेक प्रतिक्रियाही देत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

Beautiful Girl Video : गोरी, मॉडेलिंग करणाऱ्या किंवा टीव्हीवर झळकणाऱ्या तरुणी सुंदर असतात असा सर्वसाधारण समज आहे. परंतु बर्‍याच वेळा आपण दैनंदिन जीवनात दिसणाऱ्या लोकांमधील सौंदर्याकडे दुर्लक्ष करतो. सोशल मीडियावर लाखो व्हिडीओ दिसतात. मात्र त्यातील काही व्हिडीओ असे असतात जे तुमच्या हृदयाला स्पर्श करून जातात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोळ्या करणारी ही तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल इंटरनेटवर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये एका खेड्यातील मुलगी घरातील सदस्यांसाठी स्वयंपाक करताना दिसत आहे. ती अंगणात पोळ्या करताना दिसत आहे. तिच्या चेहर्‍यावरील निरागसतेने लाखो नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. या मुलीचे बरेच व्हिडिओ यापूर्वीही आले आहेत, परंतु पोळ्या करतानाचा हा व्हिडीओ लोक पसंत करीत आहेत. **( a young girl from village became a Social Media Sensation) हे ही वाचा-** VIDEO: बापरे! तरुणीनं एका हातानं पकडला विषारी साप, धाडसाचं होतंय कौतुक

चांगल्या चांगल्या अभिनेत्रीदेखील फेल आमना नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ 24 लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि एक लाखाहून अधिक लोकांना तो आवडला आहे. मुलीचे सौंदर्य पाहून नेटकरी बऱ्याच कमेंट्स करीत आहेत. काहीजण अभिनयाबाबत बोलत आहेत तर काहीजण नैसर्गिक सौंदर्य सांगून तिचे कौतुक करीत आहेत. कुणीतरी मुलीला बॉलिवूड अभिनेत्रीसारखी दिसत असल्याचंही म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या