JOIN US
मराठी बातम्या / Viral / ...म्हणून बाईक पार्क करताना ही चूक करू नका; अवघ्या 60 सेकंदात भर रस्त्यातून केली गायब, Video Viral

...म्हणून बाईक पार्क करताना ही चूक करू नका; अवघ्या 60 सेकंदात भर रस्त्यातून केली गायब, Video Viral

चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. अवघ्या काही सेंकदात चोराने दुचाकी लंपास केली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

उत्तर प्रदेश, 9 ऑगस्ट : कोरोना काळात (Coronavirus) लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये (Lockdown) अनेकांच्या हातच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे कित्येकजणं बेरोजगार झाले. दरम्यान गेल्या दीड ते दोन वर्षात देशात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. त्यातही चोरी, दरोडे या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान उत्तर प्रदेशातील (Uttar pradesh crime) सहारनपूर भागातून एक व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे. हे सीसीटीव्ही फुटेज आहे. येथे भररस्त्यात गर्दीमध्ये एका चोराने बाईक पळवल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. ही घटना सहारनपूरमधील जनकपुरी भागातील बाजोरिया मार्गावरील घटना आहे. ही घटना साधारण सायंकाळी उशिरा घडली आहे. यावेळी डॉक्टर रीना गर्ग च्या क्लिनिकच्या समोर पार्किंगमध्ये अनेक दुचाक्या उभ्या होत्या. यावेळी एक चोर तिथं आला व त्याने बाईकमध्ये काहीतरी वर-खाली केलं आणि गाडी घेऊन फरार झाला. हा प्रकार अवघ्या 60 सेकंदांमध्ये झाल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. क्लिनिकच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा सर्व प्रकार कैद झाला आहे. या फुटेजच्या मदतीने पोलीस चोरांचा तपास करीत आहेत. (Theft of a bike from the road in just 60 seconds Video Viral ) हे ही वाचा- पुराचं भयावह रुप; मगरीच्या तोंडात दिसली महिला, धक्कादायक VIDEO मुळे दहशत

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. जर भरदिवसी गर्दीच्या ठिकाणी बाईक चोरीची घटना घडू शकते तर अशा प्रकार गार्डी पार्क करणं सुरक्षित नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे शक्यतो गाडी कुठेही पार्क न करता नोंदणी केलेल्या किंवा वाहनतळ असलेल्या ठिकाणी पार्क करणं सोईचं आहे. अन्यथा या चोरीच्या घटना घडतात. सध्या पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने या चोरांचा शोध घेत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या