मुंबई, 15 जुलै : कोरोनामुळे (Corona) गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद (Schools closed) असून ऑनलाईन शिक्षण (Online education) सुरू आहे. यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक (Student and Teacher) यांच्यातील प्रत्यक्ष अंतर वाढलं असून मुलं आता शिक्षकांना काहीही बोलू लागल्याचं काही घटनांमधून दिसून येत आहे. अनेकदा शिक्षक समोर नसल्यामुळे मुलांना त्यांचा धाक राहत नसल्याचं दिसून येतं, तर मुलं माईक (Microphone) बंद न करता बोलत असल्यामुळं गोंधळाची परिस्थिती निर्माण होत असते. एका मुलीनं त्यांच्या शिक्षिकेच्या मेकअपविषयी (Teacher’s make up) आश्चर्य व्यक्त करतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral) होत आहे.
काय आहे व्हिडिओमध्ये? एक ऑलनाईन क्लास सुरू असल्याचं या व्हिडिओत दिसतं. क्लास सुरु होत असतानाच एक मुलगी शिक्षिकेचा मेकअप पाहून आश्चर्यचकित होते आणि त्याबाबत आपलं मत व्यक्त करते. किती मेकअप करून आल्या आहेत टिचर ! लिपस्टिक लावलंय, आयलाईनर पण लावलंय, त्यामुळे त्या जास्तच गोऱ्या दिसत आहेत, अशी टिप्पणी ही मुलगी करते. त्यामुळे क्लासमधील इतर सर्वांना धक्का बसतो. ही मुलगी माईक बंद करायचं विसरली असावी, असंच हे ऐकणाऱ्या सर्वांना वाटतं. प्रत्यक्षात घरातील कुणाला तरी मुलगी हे सांगत असावी. मात्र माईक सुरुच राहिल्याने ते सर्वांना ऐकू गेलं आणि सगळेच आश्चर्यचकित झाले. हे वाचा - VIDEO: ..अन् मंडपातच गाढ झोपला नवरदेव; नवरीची प्रतिक्रिया पाहून नाही आवरणार हसू शाळेतील कुणीतरी हा व्हिडिओ समाजमाध्यमावर टाकला आणि तो व्हायरल व्हायला सुरुवात झाली. सध्या देशातील लसीकरण पूर्ण होऊन कोरोनाचा धोका संपत नाही, तोपर्यंत शाळा सुरु होण्याची शक्यता धूसर आहे. ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण घेणं, हा विद्यार्थी आणि शिक्षक दोघांसाठीही नवा आणि आव्हानात्मक प्रकार असल्याचं सिद्ध होत आहे. प्रत्यक्ष शाळा सुरु होत नाहीत, तोपर्यंत असे प्रकार सुरूच राहतील, अशी चर्चा हा व्हिडिओ पाहणारे नेटिझन्स करत आहेत.