JOIN US
मराठी बातम्या / Viral / थरकाप! झोपलेल्या तरुणाच्या पांघरुणात शिरला कोब्रा, जाग आल्यावर केला हल्ला, पाहा VIDEO

थरकाप! झोपलेल्या तरुणाच्या पांघरुणात शिरला कोब्रा, जाग आल्यावर केला हल्ला, पाहा VIDEO

मंदिरात (Temple) झोपलेल्या तरुणाच्या पांघरुणात (Bed) कोब्रा नाग (Kobra snake) शिरल्यानंतर हा तरुण थोडक्यात बचावल्याची घटना समोर आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जयपूर, 7 सप्टेंबर : मंदिरात (Temple) झोपलेल्या तरुणाच्या पांघरुणात (Bed) कोब्रा नाग (Kobra snake) शिरल्यानंतर हा तरुण थोडक्यात बचावल्याची घटना समोर आली आहे. महादेवाच्या मंदिरात झोपणारा हा तरुण रोजच्याप्रमाणे अंगावर चादर घेऊन फरशीवर झोपला होता. मध्यरात्रीच्या सुमाराला एक कोब्रा त्याच्या चादरीत शिरला. सुरुवातीला त्याला काहीच कळले नाही, मात्र ज्यावेळी त्याला नाग शिरल्याची जाणीव झाली तेव्हा झटका बसल्याप्रमाणे तो तिथून दूर झाला.

अशी घडली घटना राजस्थानमधील बांसवाडा परिसरातील एक शिवभक्त तरुण दररोज शंकराच्या मंदिरात झोपत असे. या भागात बिबट्यांची आणि कोब्रा नागांची मोठी दहशत असते. कुठलाही प्राणी हल्ला करण्याची शक्यता असते. मात्र भगवान शंकरावर असणाऱ्या गाढ विश्वासाच्या जोरावर हा तरुण मंदिराच्या परिसरातच चादर घेऊन झोपत असे. नेहमीप्रमाणे हा तरुण गाढ झोपेत असताना एक कोब्रा त्याच्या पांघरूणात शिरला. झोपेत असणाऱ्या तरुणाला सुरुवातीला बेडूक पांघरूणात शिरल्यासारखं वाटलं. त्यामुळे पायाने त्याने बेडकाला दूर झटकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा काहीच उपयोग न झाल्यामुळे पांघरुणात शिरलेला प्राणी हा बेडूक नसून दुसरा कुठला तरी असल्याची त्याची खात्री पटली. हे वाचा - काय सांगता? कोरोना होऊन गेलेल्यांना लस घेण्याची गरजच नाही? जाणून घ्या सविस्तर झोपेतून चादर झटकून तो ताडकन उभा राहिला आणि काही पावलं दूरवर गेला. त्याचवेळी कोब्राने हवेत उडून त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुण काही अंतरावर उभा असल्याने या हल्ल्यातून बचावला. त्यानंतर मात्र कोब्रादेखील घाबरला आणि तिथून निघून गेला. तरुणाच्या सावधानतेमुळे आणि समयसूचकतेमुळे त्याचा जीव वाचला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या काळजाचा थरकाप उडत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या