JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO: 2 बैलांच्या लढाईदरम्यान मध्येच झाली कुत्र्याची एन्ट्री; पुढे जे घडलं ते एकदा बघाच

VIDEO: 2 बैलांच्या लढाईदरम्यान मध्येच झाली कुत्र्याची एन्ट्री; पुढे जे घडलं ते एकदा बघाच

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका कच्च्या रस्त्याच्या कडेला अचानक दोन बैल एकमेकांसोबत भिडतात आणि जोरदार मारामारी करू लागतात

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 20 मार्च : सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात त्यात प्राण्यांशी संबंधित व्हिडिओंचाही (Animal Videos) समावेश आहे. यातील काही व्हिडिओंमध्ये प्राणी मजेशीर कृत्य करताना दिसतात, तर काहींमध्ये त्यांच्यात जोरदार भांडणही होताना दिसतं. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल (Bull Fight Video) होत आहे, ज्यामध्ये बैलांमध्ये ‘गँगवॉर’ लागल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये दोन बैल आपापसात भांडताना दिसत आहेत. तेव्हाच एक कुत्राही या लढाईत सामील होतो. त्यानंतर जे बघायला मिळतं ते तुम्ही आयुष्यात कदाचितच याआधी कधी पाहिलं असेल. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि हसूही येईल. ‘हा तर भारतीय Iron Man’; हाताने केले दगडाचे 2 तुकडे, VIDEO पाहून नेटकरी अवाक व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका कच्च्या रस्त्याच्या कडेला अचानक दोन बैल एकमेकांसोबत भिडतात आणि जोरदार मारामारी करू लागतात. यादरम्यान घोड्यावर बसलेली एक व्यक्ती ही लढत पाहत असते. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, बैल एकमेकांवर कशाप्रकारे हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण अचानक एक कुत्रा भांडणात सामील होतो.

संबंधित बातम्या

हे पाहून यातील एक बैल अतिशय चिडतो आणि तो कुत्र्याचा कान तोंडाने पकडून त्याला उचलतो अन् खाली आपटतो. यादरम्यान, दुस-या बैलाला संधी मिळते, आणि तो पांढऱ्या बैलाला शिंगाने मारतो. अशी मजेशीर झुंज तुम्ही याआधी क्वचितच पाहिली असेल, ज्यात बैलांच्या लढाईत कुत्राही सहभागी झाला. रहदारीच्या रस्त्यावर चालत्या गाडीत केली चोरी; VIDEO पाहून चक्रावून जाल बैलांचा हा ‘गँगवॉर’ व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर ir_geographic नावाच्या आयडीवर शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत 25 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर शेकडो लोकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की लोकांना हा व्हिडिओ किती आवडला आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या