हरिद्वार, 28 जून : काहीतरी तुफानी करण्याचा जोश, स्टंट करणं म्हटलं हे तरुणच समोर येतात. पण एका वृद्ध महिलेने सर्वांनाच धक्का दिला आहे. एका आजीबाईमध्ये तुफानी जोश चढला आणि तिने थेट उंच पुलावरील गंगा नदीत उडी मारली. भयानक स्टंट करणाऱ्या या आजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत (70 Year old woman jumps in ganga river). उत्तराखंडच्या हरिद्वारमधील हा व्हिडीओ चर्चेत आला आहे. हरकी पैडीत एका वृद्ध महिलेने पुलावरून गंगा नदीत उडी मारली. पुलाच्या रेलिंगवर जात न घाबरता तिने नदीत उडी घेतली, त्यानंतर ती पोहोताना दिसली. या महिलेचं वय 70 वर्षे असून ती हरयाणाच्या जींदमधील असल्याचं सांगितलं जातं आहे. हे वाचा - बापरे! गाईला मृत्यूच्या जबड्यातून बाहेर काढण्यासाठी सिंहाशीही भिडला तरुण, धक्कादायक शेवट; पाहा VIDEO मीडिया रिपोर्टनुसार ही महिला गंगा नदीत स्नान करायला आली होती. तेव्हा तिने काही तरुणांना पुलावरून गंगा नदीत उडी मारताना पाहिलं. तेव्हा तिच्यातही तरुणांसारखा जोश आला. जोशात ती पुलावर तरुणांजवळ पोहोचली आणि तिनेही त्या पुलावरून गंगा नदीत उडी मारली.
दरम्यान मीडिया रिपोर्टनुसार हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.