JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO - अवघ्या 7 वर्षांचा चिमुकला बनला Delivey Boy; कारण ऐकून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही

VIDEO - अवघ्या 7 वर्षांचा चिमुकला बनला Delivey Boy; कारण ऐकून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही

अवघ्या 7 वर्षांचा डिलीव्हरी बॉय सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 04 ऑगस्ट : वय वर्षे 7… शाळेत जाण्याचं खेळण्याबागडण्याचं, हट्ट करून खाण्यापिण्याचं वय… या वयात कित्येक मुलांना स्वतःची कामंही नीट करता येत नाही त्या वयात एक मुलगा डिलीव्हरी बॉय बनला आहे. सकाळी स्कूल बॅग आणि संध्याकाळी झोमॅटोची बॅग खांद्यावर घेतो. सकाळी शाळेत जाऊन संध्याकाळी हा मुलगा फूड डिलीव्हरी करतो. इतक्या कमी वयात हा मुलगा डिलीव्हरी बॉय का बनला याचं कारण समजलं तर तुम्ही भावुक व्हाल. तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. झोमॅटोची फूड डिलीव्हरी करणारा 7 वर्षांचा डिलीव्हरी बॉय सध्या चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर त्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्या मुलाने खाण्यासाठी हट्ट करायला हवा तो मुलगा लोकांच्या घरोघरी खाणं पोहोचवतो आहे. राहुल मित्तर नावाच्या ट्विटर युझरने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हे वाचा -  बापरे! चिमुकलीच्या अंगावर चढला खतरनाक साप आणि…; काळजाचं पाणी पाणी करणारा VIDEO व्हिडीओत पाहू शकता एक लहान मुलगा हातात चॉकलेटचा बॉक्स घेऊन दिसतो आहे. तो आपल्या कामाबाबत सांगताना दिसतो. सायकलने तो फूड डिलीव्हरी करत असल्याचं तो सांगतो. हा मुलगा नेमकं असं का करत आहे, याचं कारणही या व्हिडीओ त्याला विचारण्यात आलं. तेव्हा तो आपल्या वडिलांचा अपघात झाल्याचं सांगतो. वडिलांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्या जागी तो काम करतो आहे. अचानक त्याच्या खांद्यावर कुटुंबाच्या आर्थिक खर्चाचा भार आला आणि तो त्याने पेललासुद्धा.

संबंधित बातम्या

इतक्या कमी वयात संकटकाळात आपल्या कुटुंबाचा भार आपल्या छोट्याशा खांद्यावर घेणाऱ्या या मुलाचं अनेकांनी कौतुक केलं आहे. काहींनी त्याला मदतीचा हातही पुढे केला आहे. हे वाचा -  चालत्या कारमधून रस्त्यावरून पडली चिमुकली; मागून भराभर गाड्या आल्या आणि…; धक्कादायक VIDEO काहींनी इतक्या वयात काम करायला लावल्याने आक्षेप घेतला आहे. अशा ट्विटला प्रतिक्रिया देताना राहुल यांनी झोमॅटोने या मुलाच्या वडिलांचं अकाऊंट तात्पुरत्या स्वरूपात बंद केलं आहे आणि त्यांना आर्थिक मदत दिली आहे. त्याचे वडील बरे झाल्यानंतर त्यांचं अकाऊंट सुरू करणार आहे, अशी माहिती दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या