बीजिंग, 09 डिसेंबर : मुलांसाठी बरीच खेळणी बाजारात आहेत. त्यापैकी काही खेळणी त्यांच्यासाठी खतरनाक ठरू शकतात. असंच एक प्रकरण समोर आलं आहे. एका 4 वर्षांच्या चिमुकलीचा जीव खेळण्यांमुळे धोक्यात पडला. या खेळण्यामुळे या मुलीच्या आतड्यांमध्ये छिद्र झाली. मुलीच्या पोटाचा एक्स-रे रिपोर्ट आणि तिच्या पोटात जे सापडलं ते पाहून तिचे पालक आणि डॉक्टरही शॉक झाले.
चीनमधील हे धक्कादायक प्रकरण आहे. एक चार वर्षांची मुलगी. गेल्या महिनाभरापासून तिच्या पोटात वारंवार दुखत होतं. अखेर तिच्या पालकांनी तिला रुग्णालयात नेलं. तिथं तिच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आला. तेव्हा तिच्या पोटात जे दिसलं ते पाहून डॉक्टर हैराण झाले. तिच्या पोटात छोटेछोटे गोळे होते जे एकमेकांना चिकटलेले होते. गळ्यातील मण्यांच्या माळेसारखं ते दिसत होतं.
हे वाचा - हौस म्हणून महिलेनं डोळ्यांमध्ये गोंदवला टॅटू; आता झाली अशी अवस्था की वाचूनच उडेल थरकाप
डॉक्टरांनी तात्काळ तिची सर्जरी केली. तिच्या पोटातून जे निघालं ते पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला. तिच्या पोटात मॅग्नेटिक बीड्स किंवा मॅग्नेटिक बॉल्स होते. क्रिएटिविटी डेवलपमेंट टॉय म्हणून मॅग्नेटिक बॉल्स विकले जातात. दुकानं आणि ऑनलाइनही हे बॉल्स मिळतात. चिमुकलीने हे बॉल्स एकएक करत गिळले असावेत, असा संशय डॉक्टरांना आहे. तिच्या पालकांनाही याची माहिती नव्हती.
पोटात हे मॅग्नेटिक बॉल्स एकत्र एकमेकांना चिकटले होते. त्यामुळे तिच्या आतड्यांच्या भिंतीवर छिद्र पडले होते. डॉक्टर म्हणाले तिच्या आतड्यांमध्ये एक डझनपेक्षा जास्त छेद झाले. जर सर्जरीला उशिर झाला असता तर तिचा जीव गेला असता. तब्बल 61 मॅग्नेटिक बॉल्स डॉक्टरांनी तिच्या पोटातून बाहेर काढले. या सर्जरीसाठी तीन तास गेले. आता तिच्या जीवाला काही धोका नाही.
हे वाचा - VIDEO - समोर फणा काढून आला कोब्रा; बाळाने खेळणं म्हणून हातात धरला आणि अवघ्या 30 सेकंदात…
चीनमधील हे पहिलं प्रकरण नाही. याआधी 2020 सालीही पूर्व चीनच्या शेडोंग प्रांतातील जिनानमध्ये एका पाच वर्षांच्या मुलीच्या पोटातून असेच तब्बल 190 बॉल्स काढले होते.