जॉर्डन, 22 सप्टेंबर : साधी भिंत कोसळली तरी कुणाचाही त्याखाली मृत्यू होऊ शकतो किंवा गंभीर दुखापत होऊ शकते. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल अवघ्या 4 महिन्यांच्या बाळावर संपूर्ण इमारत कोसळली पण तरी त्या बाळाला काहीच झालं नाही. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली तब्बल 30 तास राहूनही बाळ जिवतं होतं. त्यातही धक्कादायक म्हणजे त्याला साधं खरचटलंही नाही. हा चमत्कारिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जॉर्डनमध्ये एक चार मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत कित्येक लोकांचा मृत्यू झाला. तर काही जण जखमी झाले. सर्वांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढल्यानंतर ढिगारा हटवण्याचं काम सुरू होतं. ढिगाऱ्याखालून बाळाचा रडण्याचा आवाज येऊ लागला. रेस्क्यू टिमने तात्काळ तिथं धाव घेतली. आवाज येत होता, तिथून त्यांनी ढिगारा हटवला. तेव्हा त्यांना जे दिसलं ते पाहून धक्काच बसला. ढिगाऱ्याखाली बाळ होतं तेसुद्धा जिवंत. हे वाचा - सात मिनिटातच घडला चमत्कार, डॉक्टरने बाळात फुंकले ‘प्राण’; पाहा VIDEO एएफपी न्यूज एजन्सीच्या रिपोर्टनुसार अम्मानमधील एका रहिवाशी परिसरात ही दुर्घटना घडली होती. एका महिलेने सांगितलं, जेव्हा बिल्डिंग कोसळली तेव्हा ती बिल्डिंगमधून बाहेर आली होती. तिची चार महिन्यांची मुलगी बिल्डिंगच्या बेसमेंटमध्ये होती. तिला एक ऑर्डर डिलीव्हर करायची होती म्हणून तिने बाळाला तिथंच ठेवलं. काही वेळातच बिल्डिंग कोसळली आणि जो तो आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागला. बाळ तिथंच राहिलं. पण म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी… हे बाळही तसंच चमत्कारिकरित्या वाचलं. आश्चर्य म्हणजे बाळाला साधं खरचटलंही नाही.
बाळाला ढिगाऱ्याखालून बाहेर काढतानाचा व्हिडीओही समोर आला आहे. @JoCivilDefense ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केलेला हा व्हिडीओ व्हिडीओत तुम्ही पाहू शकता रेस्क्यू टीम बाळाला ढिगाऱ्याखालून बाहेर काढतं. बाळाला पाहिलंतर तर ते एकदम सुखरूप आहे. त्याच्या अंगावर कुठेच जखम दिसत नाही आहे. हे वाचा - आईनेच केला पोटच्या मुलांच्या जीवाशी खेळ, कॅमेऱ्यात कैद झालं धक्कादायक दृश्य; VIDEO VIRAL बाळाला ढिगाऱ्यातून बाहेर काढून त्याला त्याच्या आईच्या स्वाधीन करण्यात आला आहे. त्यानंतर तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.