JOIN US
मराठी बातम्या / Viral / Shocking! एकाच वेळी 4 सिंह तुटून पडले तरी बचावला तरुण; कसा वाचवला स्वतःचा जीव पाहा LIVE VIDEO

Shocking! एकाच वेळी 4 सिंह तुटून पडले तरी बचावला तरुण; कसा वाचवला स्वतःचा जीव पाहा LIVE VIDEO

एखाद्या प्राण्यावर सिंहाचा कळप तुटून पडल्याचं तुम्ही पाहिलं असेल पण माणसावर सिंहांनी केलेला असा हल्ला पाहूनच तुम्हाला धडकी भरेल.

जाहिरात

सिंहांच्या कळपाचा तरुणावर हल्ला.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 डिसेंबर : सिंह… जंगलाचा राजा… ज्याच्या डरकाळीनेच जंगलातील कितीतरी प्राणी घाबरून जातात. ज्याच्यासमोर भल्याभल्या खतरनाक प्राण्यांचं काही चालत नाही, त्याच्यासमोर माणसांचा काय टिकाव लागणार. सिंहाच्या ताकदीची क्षमता असतानाही काही लोक मात्र स्वतःच सिंहासमोर जाण्याची डेअरिंग करतात, सिंहासोबत खेळण्याचा, मस्ती करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचा परिणाम काय होतो, याची व्हिडीओ तर तुम्ही सोशल मीडियावर पाहिलेच असतील. असाच एक भयंकर व्हिडओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. सिंहाच्या माणसांवरील हल्ल्याचे तसे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण यात तसा एखादा सिंह माणसावर हल्ला करतो. यामुळे त्या व्यक्तीची काय अवस्था होते, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. विचार करा जर एकाऐवजी चार-चार सिंहांनी एकाच वेळी एकत्र एखाद्यावर हल्ला केला तर त्याचं काय होईल… अशा पद्धतीने सिंहांना एखाद्या प्राण्याची शिकार करताना तुम्ही पाहिलं असेल पण माणसांची नाही. पण या व्हिडीओत मात्र चार सिंहांनी एका माणसाची शिकार करण्याचा प्रयत्न केला आहे. हे वाचा -  बापरे! चक्क सिंहासोबत खेळायला गेला चिमुकला; पापी घेत जबड्यात हात टाकताच… व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक तरुण एका पिंजऱ्यासारख्या रूममध्ये दिसतो आहे. त्याच्या समोरून एक सिंह धावत येत त्याच्यावर झेप घेतो. त्याच्यावर हल्ला करतो. तरुण स्वतःला वाचवण्यासाठी मागे पळतो. तोच मागून दुसरा सिंह येतो आणि तो त्याला धरतो. त्यानंतर दोन्ही बाजूंनी आणखी दोन सिंह येतात. चारही बाजूंनी सिंह तरुणाला घेरतात. तरुण सिंहापासून स्वतःला वाचवण्यासाठी त्यांना मारतो, दूर ढकलतो. त्याच वेळी तो जमिनीवर खाली पडतो. सिंहाच्या तावडीतून सुटण्यासाठी त्याची धडपड सुरू असते. सिंहासोबत खेळण्याचा प्रयत्न करणाऱ्या या तरुणाला सिंहाचं असं रूप दिसताच समोर मृत्यूच दिसत होता. भीती त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते आहे. चारही सिंह त्याची शिकार करणार तोच…

तरुणाचे दोन मित्र त्याच्या मदतीसाठी धावून जातात. आणखी दोन माणसं दिसतात. सिंहही शांत होतात. त्या तरुणापासून दूर हटतात. त्यानंतर तरुण उठून उभा राहतो. त्याचं नशीब चांगलं म्हणून तो या चार-चार सिंहांची शिकार होता होता राहिला आहे. हे वाचा -  VIDEO: ..अन् चित्ता उडी घेऊन थेट पर्यटकाच्या गाडीमध्ये शिरला; पुढे जे घडलं ते पाहून व्हाल शॉक हा व्हिडीओ कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. हा व्हिडीओ पाहून बऱ्याच जणांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. सिंहांसोबत असा खेळ म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालणं, प्राण्यांचा छळ अशा कमेंट कित्येक युझर्सनी दिल्या आहेत.

संबंधित बातम्या

तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या