JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO - व्यक्तीने बॅग उलटी करताच बाहेर पडले शेकडो साप; पुढे जे घडलं ते पाहून फुटेल घाम

VIDEO - व्यक्तीने बॅग उलटी करताच बाहेर पडले शेकडो साप; पुढे जे घडलं ते पाहून फुटेल घाम

व्यक्तीच्या समोर एक-दोन नव्हे तर तब्बल 300 साप होते आणि त्यानंतर ते घडलं ते धक्कादायक आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 02 फेब्रुवारी : साप (Snake video) म्हटलं तरी आपल्याला घाम फुटतो. एक साप समोर आला तरी घाम फुटतो. विचार करा समोर सापांचा खच असेल तर काय होईल? सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ती पाहूनच धडकी भरेल. हा व्हिडीओ पाहून तुमचा डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही. व्हिडीओत पाहू शकता एका मोकळ्या जागेत एक व्यक्ती एक हिरव्या रंगाची बॅग घेऊन येतो. त्यानंतर ती बॅग उलटी करतो आणि त्यातून चक्क साप बाहेर पडतात. एक-दोन नव्हे तर सापांचा अक्षरशः खचच पडतो. शेकडो साप या बॅगेतून बाहेर येतात. यापेक्षाही धक्कादायक तर पुढे जे घडलं ते आहे. आता इतके साप पिशवीतून बाहेर टाकल्यानंतर कोणतीही व्यक्ती पळून जाईल. पण ही व्यक्ती मात्र तिथंच राहिली. उलट ती खाली बसली आणि त्या शेकडो सापांमध्ये तिने हात टाकला. एकमेकांमध्ये गुंतलेले साप त्याने आपल्या हाताने सोडवले आणि त्यानंतर सापांनी तिथून भरभर पळ काढला. हे वाचा -  बापरे! मजेत तरुणाने सिंहाच्या पिंजऱ्यात हात टाकला आणि…; थरकाप उडवणारा VIDEO महत्त्वाचं म्हणजे असं काही करताना त्या व्यक्तीने हातामध्ये ग्लोव्ह्जही घातलेले नाहीत. जसा दोरीचा गुंता सोडवावा तसा तो सापांचा गुंता सोडवतो आहे. त्याच्या चेहऱ्यावर बिलकुल भीती नाही. जणू काही हे त्याचं रोजचंच काम आहे, त्याच्यासाठी हे काम म्हणजे फार काही मोठं नाही.

संबंधित बातम्या

शेवटचा क्षण पाहून तर धडकीच भरते. कारण एक साप त्या व्यक्तीच्या पायाला विळखा घालतो. पण तरी ही व्यक्ती घाबरत नाही तर त्या सापाचा आपल्या पायातील विळखा आपल्या हाताने सोडवते आणि त्या सापाला सोडून देते. शेवटी ही व्यक्ती हात जोडतानाही दिसते. हे वाचा -  मगरीने श्वानाला पाण्यात ओढताच मालकानेही घेतली उडी अन्…, थरकाप उडवणारा VIDEO memewalanews इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्यक्तीने तब्बल 300 साप सोडल्याचा दावा युझरने केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या